आपला जिल्हा
News: सासवड व जेजुरी येथे शिबीर दौऱ्याचे आयोजन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने १८ एप्रिल रोजी जेजुरी आणि २५ एप्रिल रोजी सासवड येथे विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांची शिकाऊ अनुज्ञप्तीची मुदत संपलेली आहे, त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

याकरिता १७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शिबीराची नियोजित वेळ घेवून पक्क्या अनुज्ञप्ती संदर्भातील आवश्यक कामकाज पूर्ण करावे, असे आवाहन उप प्रादेशिक अधिकारी यांनी केले आहे.



