Crime News: पोलीसांनी केला 11 महिन्याचे बालकाच्या खुनाचा उलगडा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दि.05/04/2026 रोजी मौजे भांबार्डे येथील रविंद्र अशोक पवार यांनी खबर दिली कि, दि. 08/03/2026 रोजी त्यांची पत्नी सौ. पुजा रविंद्र पवार (वय 22 वर्षे) हि त्यांचा मुलगा कु. यश (वय 11 महिने) याच्यासह राहते घरातुन निघुन गेली होती. सदर महिला हि दि. 05/04/2026 रोजी जांबुत गावचे हद्दीमध्ये मिळुन आल्याने त्याबाबत टाकळी हाजी पोलीस चौकीचे सहा. फौज. चव्हाण यांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने दि. 08/03/2026 रोजी तिचा मुलगा ओट्यावरुन पडल्याने मयत झाला होता. त्यामुळे घाबरुन जावुन सदर मयत मुलगा बॅगमध्ये भरुन विहिरीतील पाण्यात टाकला असल्याबाबत सांगीतले होते. त्या अनुषंगाने रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयत दाखल करण्यात आले आहे. सदर मयताचे घटनास्थळी प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरुर, महादेव वाघमोडे पोलीस निरीक्षक, फॉरेन्सिक पथक, व वैद्रद्यकिय अधिकारी डॉ. सागर डांगे, (प्राथमिक आरोग्य केंद्र, रांजणगाव) यांनी भेट देवुन उपयुक्त पुरावे जमा केले आहेत. सदर मयत बाँडी हि डिकंपोज झाल्याने सदर मयताचा जागीच घटनास्थळ, व इन्क्वेस्ट पंचनामा पोस्ट मार्टम करुन मयतचा अंत्यविधी करण्यात आला आहे.
सदर 11 महिन्याचे बालकाचे मृत्युच्या घटनेचे गांभीर्य ओळखुन मयताचे तपासावरुन मयताची आई नामे सौ. पुजा रविंद्र पवार हिस विश्वासात घेवुन कौशल्यपुर्ण तपास केला असता तिने माझा मुलगा कु. यश रविंद्र पवार (वय 11 महिने) हा नेहमी किरकिर करुन रडतो, कोठेतरी निघुन जावुन दुसरा चांगला नवरा पाहुन लग्न करावे, मुलाला सोबत घेवुन गेल्यावर कोणी लग्न करणार नाही असा विचार करुन तिने मुलगा कु.यश याचे डोके घरासमोरील कपडे धुण्याचे सिमेंटी ओट्यावर आपटवुन त्याचा खुन केला आहे. त्यानंतर खुनाचा पुरावा नाश करण्याचे उद्देशाने मयत बॉडी घरातील कपड्याचे बॅगमध्ये भरुन मयत बाँडी आमचे शेतजमीन गट नं. 351 मधील विहिरीजवळ घेवुन जावुन बॅग पाण्यात बुडून राहण्यासाठी त्या बॅगमध्ये मयत बॉडीसोबत दोन दगडं भरुन मयत बॉडी विहिरीतील पाण्यामध्ये टाकुन दिली असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर तपासावरुन फिर्यादी नामे रविंद्र अशोक पवार यांचे फिर्यादीवरुन रांजणगाव पो.स्टे. येथे गुन्हा रजि नं. 156/2026 भा. न्याय संहिता 2023 चे क. 103(1), 238 (ब) अन्वये दि. 06/04/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी महिला नामे सौ. पुजा रविंद्र पवार हिस दि.06/04/2026 रोजी 18.29 वा. अटक करण्यात आले असुन पुढील तपास सुरु आहे.
सदरची कामगीरी संदीप गिल्ल पोलीस अधिक्षक पुणे ग्रा, रमेश चोपडे अप्पर पोलीस अधिक्षक पुणे, प्रशांत ढोले उपविभागीय पो. अधिकारी शिरुर विभाग यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, अशोक चव्हाण सपोनि, निळकंठ तिडके पोसई, तसेच, पो.हवा. विलास आंबेकर, पो.हवा. नितीन भोस, पो.कॉ. किशोर शिवणकर, पो.हवा. अभिमान कोळेकर, चा.पो.कॉ. पांडुरंग साबळे, म.पो.कॉ. मच्छिंद जागृती, म.पो.कॉ. निलम जाधव, पो.कॉ. नितीन दळवी यांनी भेट देवुन कौशल्यपुर्ण तपास करुन स्वताःचे मुलाचा खुनाच्या गुन्हयाचा उलगडा केला आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके रांजणगाव MIDC पो.स्टे. हे करीत आहेत.



