क्राईम

Crime News: सासवड पोलीस स्टेशनची मोठी कारवाई 21,70,960/- रू. किंमतीचा गुटखा व मुददेमाल जप्त

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दि. २५/०६/२०२६ रोजी १३.२५ वा. चे सुमारास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे बोपगाव, ता. पुरंदर जि. पुणे गावचे हद्दीत कानिफनाथ गडाकडे जाणाऱ्या रोडवर एका गोडाऊन मध्ये महाराष्ट्र शासनाचे वतीने अन्न व औषध प्रशासन मुंबई यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अन्वये प्रतिबंधीत केलेल्या व मानवी जीवीतास अपायकारक असलेल्या प्रतिंबंधीत गुटखा पान मसाला, सुगंधी तंबाखूचा साठा करण्यात आला आहे. सदर माहिती वरिष्ठांना कळवुन त्याचे आदेशाने लागलीच पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, पोहवा / २४६८ विशाल जाधव, पोहवा/१९०८ अभिजीत कांबळे, पोशि/ २९८५ प्रणय मखरे, पोशि/१४४१ सचिन किवळे, पोशि/३०३५ अक्षय चिले, मपोशि/३४३२ पल्लवी काळे असे रवाना झाले. बातमी मिळाले प्रमाणे मौजे बोपगाव, ता. पुरंदर जि. पुणे कानिफनाथ गडाकडे जाणारे रोडवरील एका गोडावुन मध्ये पहाणी केली असता पुढील वर्णनाचा माल मिळुन आला. “सिग्निचर फिनेस्ट पान मसाला, अॅक्शन ७ कंपनीचा सुगंधी तंबाखु”,” आर. के कंपनीचा सम्राट पान मसाला”, “आर. के कंपनीचा एस.टी-१ कंपनीचा सुगंधी तंबाखु” असा एकुण २१,७०,९६०/- रू चा मुददेमाल मिळुन आला. त्याबाबत सासवड पोलीस स्टेशन येथे प्रणय राजेंद्र मखरे, पो.शि.ब.नं. २९८५ नेमणुक सासवड पोलीस स्टेशन यांनी दिले फिर्यादी वरून आरोपी नामे सिराज शेख रा. शितल पेट्रोलपंपाचे शेजारी, कोंढवा खुर्द, पुणे यांचे विरूध्द गु.र.नं. २९२/२०२६ भा.न्या.सं.२०२३ कलम १२३, २२३, ३(५) सह कलम अन्न सुरक्षा मानके अधिनियम. २००६ व नियमन २०११ चे ८. लम २६ (२), २६(२) (a), २७ (३) (d), २७ (३) (e), ४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील अधिक तपास सासवड पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील या करीत आहेत.

सदरची कारवाई ही संदीपसिंह गिल्ल पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिराजदार अपर पोलीस अधिक्षक बारामती, राजेंद्रसिह गौर उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, पोहवा / २४६८ विशाल जाधव, पोहवा/१९०८ अभिजीत कांबळे, पोशि/२९८५ प्रणय मखरे, पोशि/१४४१ सचिन किवळे, पोशि/३०३५ अक्षय चिले, मपोशि/३४३२ पल्लवी काळे यांचे पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button