क्राईम

Crime News: आंतरजिल्हा टोळीतील तीन आरोपींना अटक करून जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस, दोन मोटार सायकलसह साडे तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने बाजारमुल्याप्रमाणे ५,२०,०००/- किं. चा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): सासवड पो स्टे गु.र.नं. २४१/२०२६ बी.एन.एस. ३०९ (६), १२६ (२), ११५ (२), ३५१ (२) (३),३५२,३ (५) प्रमाणे दि. ३१/०५/२०२६ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी राजकुमासर विश्वनाथ हाके, (वय ५८ वर्षे), व्यवसाय नोकरी, रा. बधेनगर राममंदिराजवळ, कोंढवा खुा पुणे हे त्यांचे मावस बहीणीसोबत पठारवाडी ता. पुरंदर जि. पुणे येथील काळुबाई मंदिराचे रोडने जाताना अनोळखी तीन इसमांनी त्यांना अडवून त्यांना मारहाण करून त्यांचेकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १,०५,०००/- रु. किं.चा मुद्देमाल जबरी चोरी करून नेला होता. सदर प्रकाराबाबत वरील प्रमाणे फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

सदर गुन्हयाचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल पुणे ग्रामीण यांनी स्था.गु.शा.चे पथकांना आदेश करून मार्गदर्शन केले होते. स्था.गु.शा.चे पथकाने समांतर तपास सुरू करून घटनास्थळी भेट दिली, आजूबाजूचे परिसरातील साक्षीदारांकडे तपास केला, त्याचप्रमाणे फिर्यादी यांचेकडून आरोपींचे वर्णन व त्यांचेकडील मोटार सायकलची माहिती घेण्यात आली. घटनास्थळाजवळ कोठेही सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते. आरोपी घटनास्थळावरून ज्या दिशेने मोटार सायकलवर पळून गेले होते, त्या रोडवरील सुमारे ६५ किमी पर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे तपासणेत आले. सदर गुन्हयात तीन आरोपींचा सहभाग आणि पॅशन व सीडी डिलक्स अशा दोन मोटार सायकलचा वापर करणेत आला असल्याचे निष्पन्न झाले तसेच आरोपी सासवड लोणंद मार्गे फलटणचे दिशेने गेल्याचे तपासात निष्पन्न झाले.

तपास पथकाने गोपनीय बातमीदारांना माहिती पुरविण्यात आली. आरोपींचा शोध सुरू असताना पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी बाळु ईश्वर माळी याने दिलीप गोरख माळी व रोहित शिवाजी ननवरे रा. फलटण ता. फलटण जि. सातारा यांनी केला असल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने तपास करत खात्री करून स्था.गु.शा. व सासवड पो स्टे कडील पथकांनी आरोपी १) बाळू ईश्वर माळी (वय ५२ वर्ष) राहणार गिरवी नाका सगुनामाता नगर, मलटण तालुका फलटण, जिल्हा सातारा, २) रोहित शिवाजी ननवरे (वय २८ वर्ष), राहणार रविवार पेठ फलटण तालुका फलटण, जिल्हा सातारा ३) दिलीप गोरख माळी (वय ४५ वर्षे) राहणार गोसावी गल्ली, सगुनामाता नगर मलठण तालुका फलटण जिल्हा सातारा यांना दि. ३०/०६/२०२६ रोजी फलटण येथून ताब्यात घेण्यात आले. कायदेशीर कार्यवाहीची पुर्तता करून आरोपींना अटक करणेत आली आहे. आरोपींकडे योग्यरित्या तपास केला असता, आरोपींनी वरील गुन्हा केल्याचे सांगितले असून सखोल चौकशी केली असता, त्यांनी १) यवत पो स्टे गु.र.नं. १३५/२०२६ बी.एन.एस.३०९ (४) २) लोणावळा शहर पो. स्टे. गु.र.नं १०९/२०२६ बी.एन.एस.३०४(२), ३(५) हे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. तसेच गुन्हा करताना आरोपींनी पॅशन मोटार सायकल व सीडी डिलक्स मोटार सायकलचा वापर केल्याचे कबुल केल्याने त्या दोन्ही मोटार सायकल तसेच सुमारे साडे तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण बाजारमुल्य प्रमाणे ५,२०,०००/- किंचा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे.

यातील आरोपी बाळु ईश्वर माळी याचेवर सातारा जिल्हयात दरोडा, जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत, तसेच आरोपी दिलीप गोरख माळी याचेवर सातारा, कोल्हापूर जिल्हयात दरोडा, जबरी चोरीचे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे ग्रामीण,अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, पुणे विभाग, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभाग, एस.डी.पी.ओ. राजेंद्रसिंह गौर, भोर उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सासवड पो स्टै चे पो.नि. विनोद घोळवे, स्था.गु.शा.चे पोसई युवराज धोंडे, श्रेणी पोसई विनोद भोकरे, सासवड पो स्टे चे पोसई परमेश्वर गोडसे, स्था.गु.शा.चे अंमलदार सचिन घाडगे, संतोष तोडकर, महेश खरात, गुरूनाथ गायकवाड, विशाल भोरडे, अक्षय यादव, विकास कापरे, राहुल पवार सासवड पो स्टे चे पोलीस अंमलदार प्रविण शेंडे, तुषार लोंढे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button