Crime News: बेकायदेशीररित्या गांजा जवळ बाळगले प्रकरणी जेजुरी पोलिसांकडून कारवाई

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मांडकी येथे महिलेच्या जवळ बेकायदेशीर बिगर परवाना गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला असून याबाबत फिर्यादी दशरथ शिवाजी बनसोडे (वय 52 वर्षे), पो. हवा.ब.न 1418 नेमणुक जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांनी आरोपी मिना नवनाथ जगताप (यय 46 वर्षे) रा मांडकी ता. पुरंदर जि. पुणे यांच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 18/11/2025 रोजी 13.10 वा. चे सुमारास मांडकी ता. पुरंदर, जि. पुणे गावचे हददीत मांडके याचे शेतामध्ये उसामध्ये येथे महीला नामे 1) मिना नवनाथ जगताप (वय 46 वर्ष) मांडकी ता. पुरंदर जि. पुणे हीने बेकायदेशीर बिगर परवाना गांजा हा माल एकुण 362 ग्रॅम वजनाचा किमंत रूपये 3500/-रू चा जवळ बाळगले स्थितीत मिळुन आली आहे. म्हणुन माझी त्याचेविरोधात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम ४ (अ), (क) 15(ए), प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद आहे. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई जगताप हे करत आहेत.



