Crime News: जेजुरी येथे होळकर तलावात अज्ञात तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी येथे होळकर तलावाच्या पाण्यात अनोळखी मृतदेह सापडला असून त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असून याबाबत फिर्यादी मारूती लालासो करडे (वय 45 वर्ष) व्यवसाय- नोकरी, रा. माळवाडी लाटे ता. बारामती, जि. पुणे यांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपी याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 21/09/2025 रोजी सकाळी 10:00 वाजताच्या पुर्वी मौजे जेजुरी ता. पुरंदर जि. पुणे. गावचे हद्दीतील होळकर तलावाच्या उत्तर बाजुस एक अनोळखी पुरूष जातीचा इसम वय अंदाजे 40 ते 46 वर्ष यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी कोणत्यातरी हत्याराने त्याचे डोक्यामध्ये जबर दुखापत करून त्याचे हातपाय बांधुन, त्याच्या गळ्याला शालीने बांधुन त्याला होळकर तलावाच्या पाण्यामध्ये टाकुन त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणुन माझी त्या अज्ञात इसमा विरूध्द कायदेशीर फिर्याद आहे. यावरून जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 318/2025 भारतीय न्याय संहिता कायदा कलम-103(1), 238 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे.
सदरचा अधिक तपासस जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई तारडे हे करत आहेत.



