Accident News: जेजुरी- निरा महामार्गावर अपघातात एक जणाचा मृत्यू

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील वाल्हे गावचे हद्दीत माळवाडी जवळील उड्डानपुलाच्या उतारावर चारचाकी व मोटरसायकल यांच्यात अपघात होऊन एक जणाचा मृत्यू झाला असून याबाबत फिर्यादी फिरोज अल्लाउदीन सय्यद (वय 47 वर्षे) व्यवसाय मजुरी रा. शिव तक्रारवाडी निरा वार्ड न 5 ता. पुरंदर जि. पुणे यांनी आरोपी – गणेष बाळकृष्ण घाडगे (वय 42 वर्षे) रा. एकबे ता. कोरेगाव जि. सातारा यांच्या विरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 7/7/2025 रोजी दुपारी 4/15 ते 4/30 वा. सुमा टाटा नेक्सॉन चार चाकी गाडी न. एम. एच. 11 सी. क्यु 2857 वरील चालक गणेश बाळकृष्ण घाडगे (वय 42 वर्षे) रा. एकबे ता. कोरेगान जि. सातारा याने त्याचे ताब्यातील वाहन जेजुरी बाजुकडुन निरा बाजुकडे घेवुन जात असताना ते हयगयीने निष्काळजीपणे, भरधाव वेगात चालवुन, रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करून चालवून, त्याचे समोर जेजुरी बाजुकडुन निरा बाजुकडे जाणारे दुचाकी नंबर प्लेटींना गाडी न. एम. एच. 11 अ. जे 9376 वरील इसम अलाउदीन खुदबुध्दीन सय्यद (वय 75 वर्षे) रा. शिव तक्रारवाडी निरा वार्ड न 5 ता. पुरंदर जि. पुणे याचे दुचाकीस पाठीमागुन ठोस देवुन अपघात करून अपघातामध्ये अलाउदीन खुदबुध्दीन सय्यद याचे डोकीस व शरीरावर झालेल्या जखमास व मृत्युस व दोन्ही वाहनाचे नुकसानीस कारणीभूत झाले आहेत. म्हणुन माझी टाटा नेक्सॉन चार चाकी गाडी न. एम. एच. 11 सी. क्यु 2857 वरील चालक गणेश बाळकृष्ण घाडगे (वय 42 वर्षे) रा. एकबे ता. कोरेगाव जि. सातारा याचेविरूध्द कायदेशीर फिर्याद आहे. यावरून जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 242/2025 भारतीय न्याय संहीता कायदा कलम 106(1), 125(a), 125(b), 281, 324(2-6) मो वा का क 184 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई पुजारी हे करीत आहेत.



