आपला जिल्हा

News: जेजुरी येथे 550 देशी वृक्ष लागवड आणि संवर्धन अभियान संपन्न

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक ८ जुलै २०२५ तीर्थ क्षेत्र जेजुरी येथे ५५० देशी वृक्ष लागवड आणि संवर्धन अभियान संपन्न झाले. श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरी आणि ति. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमानाने श्री खंडोबा गडकोटाच्या पश्चिम बाजूस असलेल्या डोंगर भागात देशी वृक्ष लागवड व संवर्धन अभियानास सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त ॲड पांडुरंग थोरवे आणि विश्वस्त ॲड विश्वास पानसे यांचे हस्ते वृक्ष लागवड करून अभियानास प्रारंभ करण्यात आला. आज रोजी एकूण ५५० देशी वृक्ष लागवड करण्यात आली आहे. मागील १५ दिवसांपासून खड्डे घेणे , त्यात माती भराव करणे , खत टाकने इत्यादी कामे सेवकांच्या वतीने श्रमदानातून चालू होते.

श्री खंडोबा देवाचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन अभियानास सुरुवात करण्यात आली. विश्वस्त मंडळाच्या वतीने संस्थान द्वारे चालू असलेल्या विविध विकास कामांची माहिती उपस्थित सर्वांना सांगण्यात आली.

या प्रसंगी मोठ्या संख्येने सर्व सेवक आणि देव संस्थानचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button