क्राईम

Crime News: जेजुरी: बंद घराचे कुलूप व कडी कोयडी तोडुन 3,50,000/- रु.कि सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील पारगाव मेमाणे ता.पुरंदर जि.पुणे येथे बंद घराचे कुलूप कडी कोयंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम कोणी अज्ञात चोरट्याने चोरी केले असून याबाबत फिर्यादी कैलास नारायण गायकवाड (वय59 वर्ष) व्यवसाय-शेती रा.पारगाव मेमाणे ता.पुरंदर जि.पुणे यांनी अज्ञात चोरटा याच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 25/6/2025 रोजी सकाळी 09/00 वा. सुमारास ते दिनांक 25/6/2025 रोजी दुपारी 01/00 वा. चे पुर्वी मौजे पारगाव मेमाणे ता. पुरंदर, जि. पुणे येथील माझे राहते घराचे बंद दरवाजाला लावलेले कुलूप व कडी कोयडी तोडुन आत मध्ये प्रवेश करून माझे संमती शिवाय अज्ञात चोरटयाने एकुण 3,50,000/-रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करून घरफोडी केली आहे. तरी माझे त्या अज्ञात चोरटया विरूद्ध कायदेशीर तक्रार आहे. यावरून जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 230/2025 भारतीय न्याय संहीता कायदा कलम 331(3), 305 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई /पाटील हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button