Uncategorizedक्राईम

Crime News: हायवा ट्रक चोरीतील आंतरराज्यीय सराईत आरोपी 20,00,000/- रु. किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक २०/०३/२०२५ रोजी पहाटे ०३.३० वाजेचे सुमारास यवत पोलीस स्टेशन हददीतुन एक हायवा ट्रक चोरीस गेला होता. त्यावरुन यवत पो.स्टे. येथे यवत पोलीस स्टेशन गुरनं २७८/२०२५ बी.एन.एस. ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल झालेने सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरु करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि/राहुल गावडे, सहा. फौ. घाडगे, पो.हवा. भुजबळ तसेच यवत पोलीस स्टेशनचे पो. हवा. गायकवाड, पोहवा. यादव असे हायवा ट्रक चोरी प्रकरणी सुमारे २०० कि.मी. अंतराचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. तसेच सोबत तांत्रीक विश्लेषणाचे आधार घेवून आरोपींची माहीती प्राप्त करून सदरचे आरोपी हे मोहोळ, सोलापूर या ठिकाणी असलेबाबत माहीती मिळालेने स्था.गु.शा व यवत पोस्टे चे स्टाफ असे मोहोळ येथे जाउन सापळा रचून एमएच १४ जी.यु. ६१७८ पांढऱ्या रंगाच्या स्वीफ्ट डीझायर गाडीसह ताब्यात घेतले असता त्यामध्ये एकुण चार इसम मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव व पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) गणेश अरूण राउत (वय ३४ वर्षे), रा. पेनुर, ता. मोहोळ, जि. सोलापुर २) धनाजी नागनाथ लोकरे (वय ३५ वर्षे), रा. लवूळ, ता. म्हाढा, जि. सोलापुर ३) दत्तात्रेय सदाशीव जाधव (वय ३४ वर्षे), रा.पेनुर, ता. मोहोळ, जि. सोलापुर. ४) लक्षमण नामदेव चौरे (वय २४ वर्षे), रा.पेनुर, ता. मोहोळ, जि. सोलापुर अशी सांगितली. त्यांचेकडे सदर गुन्हयाबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. तसेच सदर गुन्हयातील चोरलेला हायवा ट्रक क्रमांक एमएच १२ एसएफ २४२८ हा तसेच सदर गुन्हा करणे साठी वापरलेले वाहन अशोक लेलंड कंपनीचा एम. एच २६ बीई २४४३ हा (खोटा नंबर) चा टेम्पो असा एकुण २०,००,००० रु. किंमतीचा मुददेमाल ताब्यात घेतला असुन, सदरचा टेम्पो हा त्यांनी उंड्री, पुणे येथुन चोरलेला असुन त्याबाबत काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गुरनं ७७/२०२५ बीएनएस ३०३(२) दाखल आहे.

सदर आरोपींविरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल असुन ते या गुन्हयात फरार आहेत,

1) जामखेड पोलीस स्टेशन G.N. 65/25B. N. S. 303(2)

2) विजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन (कर्नाटक राज्य G.R. क्रमांक 309/24 B.N.S. 303(2)

3) कवठे महाकाळ पोलीस स्टेशन G.R.N. 486/24B. N. S. 303(2)

4) उत्तमनगर पोलीस स्टेशन G.R.No. 18/24 B.D.V. पेन 379

तरी पुढील तपासकामी आरोपींना यवत पोलीस येथे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पोलीस उपअधीक्षक बापूराव दडस उपविभाग दौंड, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो.नि नारायण देशमुख यवत पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि/ राहुल गावडे, सहा. फौ. सचिन घाडगे, पो. हवा अजित भुजबळ, पो. हवा राजू मोमीन, पो.हवा अतुल ढेरे तसेच यवत पोलीस स्टेशनचे पो.हवा. गुरुनाथ गायकवाड, पो.हवा. अक्षय यादव यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button