आपला जिल्हा

News: घरकुल योजनेतील निधीची मागणी लाभार्थी ऑनलाईनरित्या मागवू शकणार; जिल्हा परिषदेकडून ऑनलाईन सुविधा उपलब्ध

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत विविध आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या घरकुल बांधकामाच्या टप्प्यानुसार पुढील हप्ता मिळण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेमार्फत गुगल फॉर्मची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेमुळे लाभार्थ्याला या कामासाठी पंचायत समिती कार्यालयात जाण्याची गरज राहणार नसून वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंत व दिव्यांग आवास योजना आणि मोदी आवास योजना या योजना राबविल्या जातात.

आता या सुविधेमुळे घरकुल योजनेतील लाभार्थी स्वतः बांधकामाची प्रगती घरकुलाच्या छायाचित्रासह व पुढील टप्प्याची निधी मागणी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfFFKxi7lYUqkQH7cJRCMOB8kyG8DCsbPE5gFnq_3nDGedRbg/viewform?usp=header या गुगल फॉर्मद्वारे गटविकास अधिकाऱ्यांकडे नोंदवू शकणार आहेत.

लाभार्थ्याकडून आलेल्या मागणीनुसार शासकीय यंत्रेद्वारे त्याची पडताळणी व जिओ टॅगिंग केले जाईल आणि बांधकामाची खात्री पूर्ण झाल्यानंतर पुढील हप्ता मंजूर केला जाईल. त्यामुळे लाभार्थ्यास अधिक गतीने निधी मिळण्यास मदत होणार आहे.

लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरील अधिकृत गुगल फॉर्मची लिंक गट विकास अधिकारी पंचायत समिती व ग्राम पंचायत कार्यालयात, ग्रामसेवक किवा ग्राम पंचायत अधिकाऱ्याकडेही उपलब्ध आहे, असे जिल्हा ग्रामीण विकाय यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती शालिनी कडू यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button