धार्मिक

जेजुरी: महाशिवरात्री निमित्ताने खंडोबा गडावर भाविकांसाठी व्यवस्था; विश्वस्त मंडळाच्या वतीने आवाहन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी गडावर सालाबादप्रमाणे श्री खंडोबा मंदिर गडकोटातील त्रिलोक दर्शन म्हणजेच स्वर्गलिंग (शिखरलिंग), पाताळ लिंग (गुप्त लिंग), भूलोकातील (मुख्य गाभारा) लिंग दर्शनाकरिता भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता श्री मार्तंड देवसंस्थान, जेजुरी विश्वस्त मंडळाचे नियोजनानुसार महाशिवरात्री दिवशी म्हणजेच बुधवार दि.२६/०२/२०२५ रोजी त्रिलोक दर्शन व्यवस्था ही भाविकांना पहाटे ३ वाजता पासून रात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

या उत्सव कालावधीत भाविकांचा ओघ लक्षात घेता गडकोट आवारात व सज्जावर अधिकची दर्शन बारी, उन्हाची दाहकता पाहता दर्शन बारीवर सावलीची व्यवस्था तसेच गडकोट आवारात व दर्शन बारीमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी, फॅन व्यवस्था तसेच खिचडी प्रसादाची सोय पूर्ण दिवसभर अन्नदान कक्षात करण्यात येणार आहे. गावामधील मुख्य चौकामध्ये श्री खंडेरायाच्या त्रिलोक दर्शनासाठी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात येणार आहे. उत्सव कालावधीत सशुल्क दर्शन बंद राहणार आहे.

तरी सर्व भाविकांनी याची नोंद घेऊन गर्दीचा कालावधी टाळून पर्यायी दर्शन व्यवस्थेनुसार उपलब्ध वेळेचा विचार करत आपल्या निर्धारित वेळेत त्रिलोक दर्शनासाठी येऊन मंदिर व्यवस्थापनास व पोलीस प्रशासनास योग्य ते सहकार्य देवू करावे असे आवाहन श्री मार्तंड देवसंस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button