धार्मिक

News: जेजुरी: मर्दानी दसरा खंडा स्पर्धेत खंडा तोलणे व खंडा कसरत मध्ये यांनी पटकवली प्रथम क्रमांकाची पारितोषिके

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरीच्या मर्दानी दसरा उत्सव मोठया उत्साहात साजरा झाला. तब्बल 18 तास चाललेल्या या मर्दानी दसऱ्याची सांगता खंडा (तलवार) स्पर्धेने झाली. दसऱ्याच्या सांगता समारंभाच्या वेळी मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून जेजुरीचा मर्दानी दसरा हा खरेच मर्दानी असल्याची अनुभूती येते.

रात्री 2.30 वाजता पालखी सोहळ्याची भेटा भेट झाल्यानंतर ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करीत पालखी महाद्वारा मार्गे श्री खंडोबा मंदिर गडकोटात आज सकाळी 7 वाजता पोहोचली. सालाबाद प्रमाणे ऐतिहासिक खंडा तोलणे व कसरत स्पर्धा संपन्न झाल्या. खांदेकरी, मानकरी, पुजारी सेवेकरी यांचे सन्मान करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना रक्कम व आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

खंडा तोलणे – प्रथम क्रमांक रमेश शेरे (वेळ 13.28 सेकंद), द्वितीय क्रमांक अंकुश गोडसे(वेळ 13.26 सेकंद), तृतीय क्रमांक हेमंत माने (वेळ 8.43 सेकंद), चतुर्थ क्रमांक मंगेश चव्हाण, पाचवा क्रमांक सुहास खोमणे व गिरीष घाडगे, उत्तेजनार्थ सहावा क्रमांक प्रतिक खोमणे

खंडा कसरत – प्रथम क्रमांक नितीन कुदळे , द्वितीय क्रमांक अक्षय गोडसे , तृतीय क्रमांक शिवाजी राणे, चतुर्थ क्रमांक शिवम कुदळे , पाचवा क्रमांक सचिन कुदळे,उत्तेजनार्थ विशाल माने, स्वप्नील शिंदे

तसेच यावर्षी तलवार फिरविणे कसरत प्रकारामध्ये आदेश कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकविला. त्यांनी 102 वेळा तलवार फिरवत मागील तब्बल 24 वर्षाचे रेकॉर्ड मोडले. त्यांना 5000 व सन्मानचिन्ह देण्यात आले.

दोन्ही स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 51000/- रु., द्वितीय क्रमांक 35000/- रु., तृतीय क्रमांक 25000/- रु., चतुर्थ क्रमांक 20000/- रु., पाचवा क्रमांक 10000/- रु. आणि उत्तेजनार्थ 5000/- रुपये रक्कम व आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देण्यात आले.

या स्पर्धेचे पंच म्हणून सुधीर गोडसे, जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे, सोमनाथ उबाळे यांनी नियोजन केले. विश्वस्त यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

यावेळी ग्रामस्थ, मानकरी, खांदेकरी, सेवेकरी, पत्रकार आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button