धार्मिक

News: जेजुरी गडावर ह.भ.प. प्रज्ञाताई पंडित यांचे श्री मल्हार स्तोत्र निरूपण संपन्न

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी गडावर श्री मार्तंड देवसंस्थान आणि श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मल्हार स्तोत्र निरूपण या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शनिवार, ७ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध प्रवचनकार ह.भ.प. प्रज्ञाताई पंडित यांनी श्री मल्हार स्तोत्रावर अतिशय भावपूर्ण निरूपण केले. प्रा. प्रज्ञाताई पंडित या हिंदू वेद, पुराण, स्तोत्र आणि विष्णू सहस्रनामावर निरूपण करणाऱ्या ठाण्यातील एकमेव विद्वान आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या ‘प्रज्ञा स्तोत्र अध्ययन वर्ग’ या माध्यमातून जगभरातील भक्तांना विष्णू सहस्रनाम आणि १०० पेक्षा जास्त स्तोत्रांचे शिक्षण देत आहेत. त्यांनी विविध मंदिरांत आणि धार्मिक आस्थापनांत निरूपण केले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन व संकल्पना श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा मनीषा खेडेकर यांनी केली होती. त्या स्मायर फार्मास्युटिकल्सच्या संचालिका असून सामाजिक उपक्रमांसाठी त्या विशेष सक्रिय आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर, अॅड. पांडुरंग थोरवे, मंगेश घोणे यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित सदस्यांमध्ये राहुल निकम, संतोष खोमणे, महेश शिंदे, दादा खोमणे यांचा समावेश होता. हा कार्यक्रम भाविक आणि भक्तांसाठी एक प्रेरणादायी धार्मिक सोहळा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button