आपला जिल्हाशहर

News: सासवड नगरपरिषदेची सन 2023-24 या आर्थिक वर्षातील घरपट्टी व पाणीपट्टी भरणेबाबत जाहीर आवाहन: मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): सासवड नगरपरिषदेची सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील घरपट्टी व पाणीपट्टीची बीले मालमत्ताधारकांना वाटप करून झालेली आहेत. तरी ज्या मालमत्ताधारकांनी सन २०२३- २४ ची घरपट्टी व पाणीपट्टीची बिले भरलेली नसेल त्यांना सदर बिले भरण्यासाठी ऑनलाईन संकेतस्थळावर – www.saswadnagarparishad.org या वेबसाईटव्दारे तसेच RTGS / NEFT व प्रत्यक्ष नगरपरिषदेत रोख किंवा क्युआरकोड स्कॅनकरून भरणा करणेची सुविधा उपलब्ध करून देणेत आलेली आहे. तरी मालमत्ताधारकांनी त्वरीत बिले भरावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे जाहीर आवाहन सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले आहे.

जे मालमत्ताधारक मुदतीत कराचा भरणा करणार नाहीत, अशा मालमत्तांवर महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५० ते १५६ अन्वये मालमत्ता सील करणे, मालमत्तेचा अटकाव करणे, जप्त मालत्तेची विक्री करणे, नळ कनेक्शन बंद करणे इत्यादी स्वरूपाची वसुलीकामी कारवाई करणेची मोहिम सुरू आहे. तसेच सदर रक्कम मालमत्ता कराची येणेबाकी समजून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ नुसार अन्य मिळकतीवर बोजा चढवणेची कारवाई केली जाणार आहे.

तसेच आपल्या मालमत्तेसमोर जप्ती पथक येवून हलगी वाजवून वसुलीची मोहिम राबविणार आहे. सासवड नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर फ्लेक्स लावून संबंधित थकबाकीदारांची काळी यादी जाहीर करणेत येणार आहे. तरी सर्व मालमत्ताधारकांनी जप्तीची व दंडात्मक कारवाई टाळावी व सासवड नगरपरिषदेचा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील घरपट्टी व पाणीपट्टी कराचा भरणा त्वरीत करावा. असे सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button