क्राईम

Crime News: क्रिप्टोकरन्सी वॉलेटची की चोरुन आर्थिक फसवणूक केलेल्या आरोपीस सायबर पोलीसांनी केले जेरबंद

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुरनं ११६/२०२३ भादवि कलम ४१९, ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्ह्यातील फिर्यादी यांना क्रिप्टोमध्ये जास्तीचा नफा कमवून देण्याचे अमिष दाखवून आरोपी नामे पवनकुमार तत्ववेदी (वय ३५ वर्षे) याने तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला. तक्रारदार यांना सुरवातीला तक्रारदार यांच्याच खात्यावर ट्रेडींग करण्याचे अमिष दाखवून नंतर लेजर नॅनो वॉलेट खरेदी करण्याचा सल्ला दिला व त्यामध्ये क्रिप्टो करन्सी साठवून ठेवण्याची माहिती देण्याच्या बहाण्याने त्यांच्या लेझर वॉलेटचा युजर आयडी व २४ कॅरॅक्टरची की चोरुन घेतली. त्यानंतर नमुद आरोपीने दुबई येथे जावून लेझर वॉलेटचा युजर आयडी व २४ कॅरॅक्टर पासवर्ड की चा वापर करुन दुसऱ्या लेझर वॉलेट येथे क्रिप्टो करन्सी वळती केली म्हणून गुन्हा नोंद आहे.

तपासा दरम्यान सर्व ब्लॉकचेनशी पत्रव्यवहार करुन क्रिप्टोकरन्सीचा शोध घेतला असता बायनान्स या क्रिप्टो एक्सचेंजला क्रिप्टोकरन्सी गेली असल्याची माहिती प्राप्त झाली. बायनान्स या क्रिप्टो एक्सचेंजला क्रिप्टोचा ट्रेलबाबत माहिती करीता पत्रव्यवहार केला असता बायनान्स एक्सचेंजने त्यांच्याकडे असलेल्या व फिर्यादींच्या खातेधारकांची माहिती दिली.

जून २०२३ मध्ये दुबई येथे गेलेला आरोपी हा परत भारतामध्ये १६ नोव्हेंबर रोजी आला. त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवले असता आरोपी पवनकुमार तत्ववेदी हा पुन्हा दुबई येथे पळून जाण्याची बातमी मिळाली तसेच तो दिनांक १६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथून जोधपुर येथे गेला होता. आरोपीच्या हालचालीबाबत बँक खाती, मोबाईल लोकेशन या बाबीवर लक्ष ठेवले असता तो दिनांक २३/११/२०२३ रोजी जोधपुर ते पुणे येथे इंडिगो फ्लाईटने येणार असलेबाबत नमुद एअरलाईनकडून माहिती मिळाली. सदर बातमीस अनुसरून सायबर पोलीसांचे पथक पोलीस उप निरीक्षक धनाजी टोणे, पो.शि. राठोड, जमदाडे, बिरादर यांनी एअरपोर्ट अथोरिटीच्या कायदेशिर परवानगीने व एअरपोर्टमध्ये प्रवेश पास मिळवून आरोपीस पुणे एअरपोर्ट येथे पकडण्यात आले.

आरोपीस पुढील तपासकामी सायबर पोलीस ठाण्यास आणून तपास केला असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने दिनांक २३/११/२०२३ रोजी आरोपीतास अटक करण्यात आली. अटक आरोपी पवनकुमार यास मा न्यायालयात रिमांडकामी हजर केले असता मा न्यायालयाने आरोपीस दिनांक ०१/१२/२०२३ रोजीपर्यंत ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक आरोपीताच्या ताब्यातून त्याचे दोन मोबाईल, तिन सिम कार्ड, दहा एटीएम कार्ड, पासपोर्ट, दुबईचे ओळखपत्र (भारतीय चलनातील मुल्य ३६०००/- रुपये) एवढी युरोपियन चलनाच्या नोटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक २४/११/२०२३ रोजी अटक केलेल्या आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने तपास केला असता पुराव्याच्या आधारे पंकज रघुवीर तत्ववेदी (वय ३५ वर्षे) या आरोपीचा सहभाग यात दिनांक २४/११/२०२३ रोजी अटक केली आहे. दोन्ही आरोपीस ०१/१२/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, ए. एन. राजे व.पो.नि. मिनल सुपे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे, पोलीस अंमलदार राठोड, जमदाडे, बिरादर, तसेच विषेश शाखेचे सहा पोलीस उप निरी. बकरे व विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गुरव या पोलीस पथकाने यशस्वी रित्या पार पाडली. अशा प्रकारे बँक खात्याशी व क्रिप्टो खात्याची गोपनिय माहिती इतरांना प्रसारीत न करता सावध राहण्याबाबत सायबर पोलीस स्टेशन, शिवाजीनगर, पुणे यांचेकडून आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button