क्राईम

Crime News: ऐन दिवाळीच्या सणामध्ये लोहगाव येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या दोन सराईतांना केले जेरबंद

प्रतिनिधी(महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक ११/११/२०२३ रोजी रात्री ११/१० वाजताचे सुमारास लोहगाव वाघोली रोडवरील विष्णुपार्वती पेट्रोलियम या एच.पी. कंपनीचे पेट्रोल पंपाचे ऑफिस मध्ये कर्मचारी पंप बंद करुन दैनंदिनी हिशोब करीत असताना, चार अनोळखी इसमांनी तोंडाला रुमाल बांधुन, दोन लोखंडी हत्यारासह पेट्रोल पंपाच्या ऑफिस मध्ये प्रवेश करुन पंपावरील कर्मचारी यांना हत्याराचा धाक दाखवुन, त्यांचे मोबाईल फोन फोडुन, मारहाण करुन त्यांचे कडील एकुण २८,८००/- रुपये जबरदस्तीने काढुन घेवुन चोरी करुन पळुन गेले बाबत विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने वरिष्ठांचे आदेशा प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देवुन तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना तपासा बाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे यातील आरोपींचा शोध घेत असताना, पोलीस अमंलदार उमेश धेंडे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पवार वस्ती लोहगाव येथे राहणारा आकाश शर्मा यास सदरचा गुन्हा करणारे इसमांबाबत माहीती आहे. त्याप्रमाणे इसम नामे आकाश शर्मा यास चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले होते. त्यास विश्वासात घेवुन अधिक तपास करता त्याने प्रथम सदरचा गुन्हा हा माझ्या लोणावळा येथील मित्रांनी केल्याचे सांगितले होते.

विमानतळ पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, विजय चंदन यांनी त्यांचे स्टाफसह यातील आरोपींचा शोध घेत असताना, आरोपी नामे आशुतोष संतोष साठे यास गुन्ह्यामध्ये वापरलेल्या दुचाकीसह पौड, पुणे येथुन ताब्यात घेतले होते. त्याचेकडे अधिक तपास करता सदरचा गुन्हा हा आकाश शर्मा याने दिलेल्या माहीती वरुन आम्ही केल्याचे व आकाश शर्मा याचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. दाखल गुन्ह्यामध्ये आरोपी नामे आशुतोष संतोष साठे व आकाश हरेंद्र शर्मा यांना अटक केले असुन, दाखल गुन्हयात आरोपी यांचेकडून गुन्हयात वापरलेली एक मोटार सायकल जप्त केली असून रोख रक्क्म, हत्यारा बाबत तपास चालू आहे व इतर आरोपींचा शोध सुरु आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास विजय चंदन, सहा. पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा पोलीस उपायुक्त परिमंडळ-०४, पुणे, शशिकांत बोराटे, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, संजय पाटील यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे, आनंदराव खोबरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती. संगीता माळी यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, विजय चंदन पोलीस उप-निरीक्षक, अविनाश शेवाळे, पोलीस अमंलदार, उमेश धेंडे, राकेश चांदेकर, सचिन कदम, शैलेश नाईक, रुपेश पिसाळ, तुषार आल्हाट, अंकुश जोगदंडे, गिरीश नाणेकर, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, विशाल निलख, ज्ञानदेव आवारी यांचे पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button