Crime News: सराईत मोटार सायकल चोराला अटक करुन त्याच्याकडून सुमारे 30 लाख रूपये किंमतीच्या 19 मोटार सायकल हस्तगत करून 19 गुन्हे आणले उघडकीस

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): बारामती शहर तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मागील पंधरा दिवसा पासुन मोठ्या प्रमाणात बुलेट चोरी चे प्रमाण वाढलेले असल्याने मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, बारामती उप विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, नारायण पवार, यांना स्थानिक गुन्हे शाखेची व बारातामी तालूका पो स्टे कडील पथके तयार करुन रात्रगस्त/पेट्रोलींग करणे, संशईत वाहने चेक करणे, संशईत आरोपी चेक करणे याबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथके तयार करुन त्यांना मागदर्शन करून सराईत बुलेट चोरांचा लवकरात लवकर शोध घेण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पो स्टे कडील अधिकारी व अंमलदार यांची पथके बारामती शहर परिसरात गस्त करीत असताना एक संशईत इसम चोरीची मोटार सायकल घेवुन मेडिकल कॉलेज परिसरात येणार असलेबाबत गोपनीय बातमी प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा, बारामती तालुका पोलीस स्टेशन कडील अंमलदार यांनी सापळा लावला होता. त्या दरम्यान एक संशईत इसम हा चोरीची मोटार सायकल घेवुन पेन्सिल चौकाकडून मेडिकल कॉलेज कडे जात असताना दिसला. त्यास पथकाने पाठलाग करून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव समाधान बाळू काळे (वय २३ वर्ष) रा. मानेवाडी ता. फलटण जि.सातारा असे सांगितले. त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता तो एकटाच व्ही. आय.पी नंबर प्लेट असलेल्या बुलेट व इतर मोटार सायकल रात्रीच्यावेळी चोरी करुन चोरी केलेल्या वाहनावर महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र वनसेवा, एसटी महामंडळ असे लोगो लावुन चोरी केलेल्या मोटार सायकलचा वापर करुन पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करत असले बाबत कबुली दिली आहे. त्यास सदर गुन्हयाचे कामी अटक करुन त्याचेकडुन खालील प्रमाणे १३ बुलेट मोटार सायकल व इतर ६ मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत.
१) एमएच ४२ बीके ३००३, २) एमएच ४२ एव्ही २१२१,
३) एमएच ४२ बीके ०७४९, ४) एमएच ४२ बीके ९७०९,
५) एमएच ४२ बीडी ९४०, ६) एमएच सेन्स एटीएन्स पंचवीस,
७) एमएच ४२ एझेड ०३७४, ८) एमएच ४२ एझेड १६१६,
९) एमएच ४२ एबी १२१२, १०) एमएचने टीजी ६७,
११) एमएच ४२ एव्ही ७८६९, १२) MH ४२ UQ ०३०३,
१३) MH ४२ EA ९९७७, व ६ इतर मोटार सायकल असा जप्त करण्यात आल्या आहे.
आरोपीकडून सुमारे ३० लाख रूपये किंमतीच्या १३ बुलेट व ६ इतर मोटार सायकल हस्तगत करून बारामती शहर व बारामती तालुका पोलीस स्टेशन कडील दाखल असलेले एकुण १९ गुन्हे उघडकीस आणले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, बारामती उप विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक सुधीर बाळुंज, श्रेणी पो.स.ई बाळासाहेब कारंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार शिवाजी निकम, किशोर तेलंग, स्वप्निल अहिवळे, शैलेश स्वामी, गुलाव पाटील, सुलतान डांगे, तुषार चव्हाण, रईस मुलानी, गणेश डेरे, बारामती तालुका पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार अभिजीत एकशिंगे, शशिकांत दळवी, भगवान थोरवे, मनोज पवार, सुरेंद्र बाघ, जितू शिंदे, भारत खारतोडे, जयश्री आटोळे, विठ्ठल तरंगे, यांनी केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून पुढील तपास बारामती तालुका पोलीस स्टेशन करत आहे.



