Crime News: जेजुरीत सापडला अनोळखी महिला मृतदेह

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दि. 13 जेजुरी रेल्वे स्टेशन परिसरात अंदाजे 50 ते 55 वर्षे वयाच्या एका अनोळखी महिलेचे प्रेत जेजुरी पोलिसांना आढळून आले आहे. याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की जेजुरी रेल्वे स्टेशन परिसरातील भालेराव वस्ती दरम्यान नाझरे धरणाकडे जाणाऱ्या कच्चा रस्त्याच्या कडेला एका अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आले.
सदर महिलेचे वय 50 ते 55 असून अंगात हिरव्या व पांढऱ्या रंगाचा टॉप, लालसर रंगाची पँट , उजव्या हातावर s v अशी अक्षरे गोंदली आहेत. सदर महिलेचा जुन्या आजाराने मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा अंदाज असून सदर मयताचे शव विच्छेदन करण्यात आले असून ओळख पटविण्यासाठी सदरचे प्रेत तीन दिवस शवगृहात ठेवण्यात आले आहे.
सदर महीलेविषयी कोणास माहिती असेल तर जेजुरी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक फौजदार नंदकुमार पिंगळे यांनी केले आहे.



