Crime News: गायी चोरणारी टोळी जेजुरी पोलीस स्टेशनच्या ताब्यात

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ६५७/२०२४ भा.द.वि.क.क ३७९,३४,४११. फिर्यादी नामे- प्रशांत शंकर लिंभोरे (वय ३० वर्षे) धंदा शेती रा. शिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे यांनी दिनांक २१/१०/२०२३ रोजी जेजुरी पोलीस स्टेशन येथे हजर राहुन फिर्याद दिली होती की, दिनांक २०/१०/२०२३ रोजी संध्याकाळी २०:०० वाजण्याचे दरम्यान ते २१/१०/२०२३ रोजी सकाळी ०६:०० वाजण्याचे दरम्यान रात्रीच्या वेळी फिर्यादीचे मालकीच्या एकुण दोन जर्सी गायी प्रत्येकी कि. ६८,०००/- रूपयेच्या फिर्यादीच्या शेतातील गोठयावरून अज्ञात चोरटयांनी संमतीशिवाय चोरी करून चोरून नेलेल्या आहेत. वगैरे मजकुर वरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्हयाचा तपासामध्ये गुन्हयातील गेला माल दोन गायी पैकी एका गायीचे कानातील अनुदान बिल्ला ट्रान्सपर यावरून गायीचा शोध लागुन आरोपी १) सागर अशोक गोंलाडे (वय – ३४ वर्षे) रा. गोंलाडेवाडी साबळेवाडी ता. बारामती, जि. पुणे २) रविंद्र ठकसेन रायते (वय २९ वर्षे) रा. गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा, यांनी गुन्हयातील चोरीस गेला माल दोन गायी या रेखी करून दिनांक २१/१०/२० २३ रोजी रात्री परस्पर चोरी करून त्या गायी आरोपी कमांक ०३) गणेश शंकर भोसले (वय २४ वर्षे) रा. मठाचिवाडी ता. फलटण, जि सातारा. याचे मदतीने विकी केलेल्या होत्या. तसेच गुन्हयातील चोरीस गेले मालापैकी एक गायी मठाचीवाडी ता. फलटण, जि सातारा येथुन गणेश भोसले याचे ताब्यातुन दिनांक ०९/२/२०२४ रोजी मिळुन आली आहे. सर्व आरोपीतांना ताब्यात घेवुन गुन्हयाचे कामी ता. १०/०२/२०२४ रोजी ०१:३५ वाजता अटक करणेत आलेली आहे. अटेकनतर तीन आरोपीना दिनाकं १३/२/२०२४ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमाड मंजुर करण्यात आली असुन रिमांड मुदत दरम्यान पोलीसांनी आरोपीचे ताब्यातुन आणखी एक किंमती गायी साठेगाव ता. फलटण, जि. सातारा येथे आरोपीतांनी दाखवुन दिली असुन ती गायी ताब्यात घेवुन गुन्हयातील गेला सर्व माल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. गुन्हा व गायी चोरण्यासाठी वापरण्यात येणारे पिकअप वाहन कमांक एमएच १२ एव्ही ४०४६ हे बारामती येथुन आरोपीने काढुन दिलेने जप्त करण्यात आलेले आहे. तसचे सदर तीन आरोपी पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असुन आणखी पुढील तपास चालु आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड, यांचे मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, दिपक वाकचौरै यांचे सुचनानुसार जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार तात्यासाहेब खाडे, शशिकांत लोढे, सहा. फौजदार चंद्रकांत झेंडे, पोलीस शिपाई शुभम भोसले यांनी केला असुन तपासामध्ये पोलीस मित्र बापु भोर, नाना घोगरे, संदीप राजपुर, यादव पशुवैधकीय अधिकारी विशाल लिभोरे यांनी तपासात सहकार्य केले पुढील अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशन करीत आहे.



