क्राईम

Crime News: कामगारांना रोडवर आडवून मोबाईल लूटनाऱ्या 03 आरोपींना अटक; 1.50 लाख रु किंमतीचे 06 मोबाईल व 1 मोटार सायकल जप्त एकूण 02 गुन्हे उघडकीस

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हहितील रांजणगाव एमआयडीसी मध्ये दि. 14/01/2026 रोजी 19.30 वाच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिरा समोरुन सुरेश मलाबाई पारगील रा. पाचामोडी ता सांगावाडा जि म्हैसाघर राज्य गुजरात हे पायी जात असताना तीन आज्ञात चोरट्यांनी पॅशन प्रो मोटार सायकल वरुन येऊन त्यांना रोडवर आडवुन शिवीगाळ दमदाटी करून त्यांचे जवळील 9000 रु कि. मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावुन घेऊन पळून गेल्याची घटणा घडली होती. त्यावरुन सुरेश गलाबाई पारगील रा. पाचामोडी ता सांगावाडा जि. म्हैसाघर राज्य गुजरात यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यात एमआयडीसी मधील कामगारांचे मोबाईल फोन जबरदस्तीने चोरी करुन घेऊन गेले असल्याने पोलीस निरिक्षक महादेव वाघमोडे यांनी गुन्हा उघडकिस आणण्याचे दृष्टिने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक अविनाश थोरात, सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अमंलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर यांना कौशल्यपुर्वक आरोपींचा शोध घेउन गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.

रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे तपास पथकाने तात्काळ गुन्हा घडले ठिकाणी भेट देऊन फिर्यादीने दिलेल्या वर्णनाप्रमाणे तसेच परिसरातील स्थानिक नागरीकांकडे चौकशी करुन 3 आरोपींना ताब्यात घेण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला यश आले. सदर आरोपीं कडुन गुन्ह्यातील चोरी गेलेले मोबाईल व्यतिरीक्त इतर 5 मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेली पेंशन प्रो मोटार सायकल व असा एकुण 1,50,000/- रु किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आलेले आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे १) निलेश चंद्रकांत पवार (वय- 28 वर्षे) रा. भोंद्रे कान्डुर ता पारणेर जि अहिल्यानगर, 2) मोहन विठ्ठल भोगे (वय 28 वर्षे) रा. प्रितम प्रकाशनगर शिरुर जि पुणे, 3) अभिजीत चंद्रकांत पवार (वय- 35 वर्षे) रा. हिवरगावपठार ता संगमणेर जि. पुणे असे असुन त्यांनी मोबाईल चोरल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन चे एकुण 02 गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे, तपासात आरोपीकडुन ताब्यात घेतलेले मोबाईल फोन परत मिळालेने रांजणगाव एमआयडीसी मधील कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल, रमेश चोपडे, अप्पर पोलीस अधिक्षक पुणे विभाग, प्रशांत ढोले, उपविभागिय पोलीस अधिकारी शिरुर विभाग शिरुर, यांचे मार्गदर्शना खाली महादेव वाघमोडे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरिक्षक अविनाश थोरात, सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर, संदिप भांड यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा फौज शिंदे, पो. हवा सरजीने हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button