Crime News: डॉक्टरचे अपहरण करून खंडणी उकळणाऱ्या टोळीतील चार आरोपींना ताब्यात घेवून खंडणीची रक्कमेसह गुन्हयात वापरले वाहन असा एकूण 15,80,000/- रू. चा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): ऊरुळी कांचन पोलीस स्टेशन गु.र.नं. ०९/२०२६ वी.एन.एस. १४०(२), १४०(३), १२६(२), १२७(२), ११५(२), ११७(२), ३५१(३), ३०८(२), ३०८(३), ३(५) प्रमाणे दि. १४/०१/२०२६ रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील फिर्यादी विठ्ठल किसन चौधरी (वय ५८ वर्षे), व्यवसाय डॉक्टर रा. कुंजीर वाडी, ता. हवेली जि. पुणे हे दि. १०/०१/२०२६ रोजी रात्रौ १०/१५ वा. सुास सोलापूर-पुणे हायवे रोडने ऊरूळी कांचन वाजुकडून कुंजीर वाडी कडे त्यांचेकडील कार मधून जात होते. त्यांचेसोबत ड्रायव्हर राजेंद्र छगन राजगुरु हा होता. इनामदार वस्ती येथे डॉक्टरांचे कारला पांढरे रंगाची इरटीगा कार आडवी मारण्यात आली व डॉक्टरांची कार थांबविली. इरटीगा कारमधील चार अनोळखी आरोपी डॉक्टरांचे कारमध्ये बसले आणि त्यांना चाकूचा धाक दाखवून जीव मारण्याची धमकी दिली आणि डॉक्टरांचे अपहरण करून पुन्हा ऊरूळी कांचन येथून शिंदवणे बाजूकडे घेवून गेले. डॉक्टरांना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आरोपींनी ०४ लाख रुपये खंडणी घेवून डॉक्टरांना चौफुला येथे सोडले आणि आणखी १५ लाख रुपये खंडणी मातिली व नाही दिली तर जीवे ठार मारू अशी धमकी दिल्याने डॉक्टरांनी भितीपोटी दि. १२/०१/२०२६ रोजी १५ लाख रुपये आरोपींना दिले असे एकूण १९ लाख रूपयांची खंडणी आरोपींनी डॉक्टरांकडून घेतली आहे. सदर प्रकाराबाबत पिडीत डॉक्टर यांनी वरील प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.

सदरचा गुन्हा गंभीर असल्याने पोलीस संदीप सिंह गिल्ल, पुणे ग्रामीण, यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत योग्य ते मार्गदर्शन व सुचना देवून स्था.गु.शा. व ऊरुळी कांचन पो स्टे कडील अशी दोन पथके तयार केली. सदर गुन्हयाचा समांतर तपास हा तपास पथकांमार्फत सुरू करणेत आला. फिर्यादी व साक्षीदारांकडे तपास करत असताना डॉक्टरांचे ड्रायव्हर वरील संशय बळविला आणि ड्रायव्हरचा गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तपास पथकाने ड्रायव्हर आरोपी १) राजेंद्र छगन राजगुरु (वय ३२ वर्षे), व्यवसाय ड्रायव्हर रा. अनंतपुर, पैठण जि. छत्रपती संभाजीनगर यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने डॉक्टरांचे अपहरण त्याचे साथीदारांचे मदतीने करून खंडणी घेतली असल्याचे सांगितले. त्या माहितीचे आधारे व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपी २) संतोष सोमनाथ बनकर (वय ३६ वर्षे), रा. अनंतपुर, पैठण जि. छत्रपती संभाजीनगर, ३) दत्ता ऊर्फ गोटू बाळू आहेर (वय ३४ वर्षे), व्यवसाय शेती, रा. अनंतपुर, सी.आर. गेट, पैठण जि. छत्रपती संभाजीनगर, ४) सुनील ऊर्फ सोनू मुरलीधर मगर (वय ३० वर्षे), व्यवसाय मजुरी, रा. गणेश नगर, गारखेडा परिसर, जि. छत्रपती संभाजीनगर, यांना तपास पथकाकडून ताब्यात घेण्यात आले असून आरोपींकडून गुन्हयात वापरलेली पांढरे रंगाची इरटीगा कार किं.रू. ८,००,०००/- व गुन्हयातील खंडणीची रक्कम ७,८०,०००/- असा एकूण १५,८०,०००/- रू.चा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे.
आरोपी अ.क्र. १ ते ४ यांना मा. न्यायालया समक्ष उपस्थित केले असता, दि. २०/०१/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करणेत आली आहे. आरोपी सुनील मगर याचेवर यापुर्वी मालमत्ता चोरीचे ०३ गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, दौंड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो.नि. सचिन वांगडे, ऊरूळीकांचन पो.स्टे., सपोनि ज्ञानेश्वर बाजीगरे, ऊरूळीकांचन पो.स्टे., स्था.गु.शा.चे पो.स.ई. अमित सिदपाटील, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, आसिफ शेख, राजू मोमीण, योगेश नागरगोजे, धिरज जाधव, अजित काळे, प्रविण चौधर, निलेश जाधव, प्रशांत पवार, विशाल रासकर, सुमित वाघ, दिपक यादव, अमोल राऊत यांनी केली असून पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर वाजीगरे नेम. ऊरूळी कांचन पो. स्टे. हे करत आहेत.



