क्राईम

Crime News: शेतकऱ्यांचे शेळी व बोकडे चोरणारे दोन चोरट्यांना पोलीसांनी केली अटक, चोरी झालेले शेळी बोकडे शेतकऱ्यांना परत देण्यास यश, एकूण 05 गुन्हे उघडकिस

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हहितील बाभुळसर खुर्द, करंजावणे, गणेभाव खालसा व वाघाळे येथुन शेतकऱ्यांचे शेळी व बोकड हे मोटार सायकल वरुन येणारे दोन अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले बाबत घटणा घडल्या होत्या, त्यावरून माणिक रामभाऊ काळे य बाभुळसर खुर्द ता. शिरुर, जि. पुणे यानी दिलेल्या फिर्यादी वरुन बोकड चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशाच प्रकारे इतर शेतकऱ्यांच्या शेळ्या व बोकडे हे चोरीस गेले बाबत माहीती मिळाल्यावर एकुण 05 गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सदर गुन्ह्यात शेतकऱ्यांचे शेळी व बोकडे चोरी होत असल्याने पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी गुन्हा उघडकिस आणण्याचे दृष्टिने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातिल पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अमंलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर यांना कौशल्यपुर्वक आरोपींचा शोध घेउन गुन्हे उयडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.

रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे तपास पथका कडुन दोन अज्ञात चोरट्याचा शोध सुरु होता, तपास पथकाने शिरूर तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यातिल 150 पेक्षा जास्त सीसीटिव्ही तपासुन व तांत्रिक विश्लेषनाचे अधारे आरोपींचा शोध घेणे सुरु असताना पोलीस अंमलदार योगेश गुंड यांना त्यांचे बातमिदारा मार्फत बातमी मिळाली की, गव्हाणवाडी ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर येथिल दोघे जण मोटार सायकल वर येउन शेळी व बोकडे चोरुन घेउन जात असले बाबत माहिती मिळाली. तसेच तांत्रिक विश्लेषना चे आधारे गुन्ह्यातील अज्ञात चोरटे हे त्याच भागात जात असल्याचे निष्पन्न झाल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे तपास पथकाने आरोपी नामे १) गणेश कैलास ब्राम्हणे (वय 21 वर्षे) २) सुनिल अण्णाभाउ माळी (वय 24 वर्षे) दोन्ही रा. गव्हाणवाडी, संतोष रिकामे यांचे विटभट्टी जवळ ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर यांना गव्हाणवाडी परिसरातुन अटक केली. तपासात आरोपींनी बाभुळसर खुर्द, कर्डिलवाडी, वाघाळे, गणेभाव खालसा, व शिरूर तालुका परिसरातुन शेतकऱ्यांचे वरील बोकड व शेळ्या चोरल्याची कबुली दिली. आरोपीं कडुन चोरी केलेले 05 बोकडे व 01 शेळी तसेच गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटार सायकल व असा एकुण 1,15,000/- रु किमतीचा ऐवज जप्त करण्यात पोलीस पथकास यश आलेले आहे, सदर आरोपी यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन चे एकुण 05 गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे, तपासात आरोपीकडून ताब्यात घेतलेले शेळी व बोकड शेतकऱ्यांना परत मिळालेने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल, रमेश चोपडे, अप्पर पोलीस अधिक्षक पुणे विभाग, प्रशांत ढोले, उपविभागिय पोलीस अधिकारी शिरूर विभाग शिरूर, यांचे मार्गदर्शना खाली महादेव वाघमोडे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर, नितिन भोस, संदिप जगदाळे, रामेश्वर वाहेकर यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो हवा नितिन भोस, संदिप जगदाळे, नितेश हुडे हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button