Crime News: जेजुरी- सासवड महामार्गावर मोटर सायकल व कारचा अपघात; एक जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी सासवड महामार्गावर मोटर सायकल आणि कारचा अपघात होऊन एक जणांचा जागीच मृत्यू झाला असून याबाबत फिर्यादी – फिर्यादी सागर बळीराम जगताप (वय 30 वर्ष) व्यवसाय नोकरी रा हिंगणगाव ता हवेली जि पुणे यांनी आरोपी सतीश बाळासाहेब कदम (वय 48 वर्ष) व्यवसाय ड्रायव्हर यांच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार आज ता. 26/11/2025 रोजी सकाळी 06/45 वाजताचे सुमारास मौजे जेजुरी गावचे हददीत सासवड जेजुरी रोडवर ब्रम्हांण्ड हॉटेलजवळ रोडवरून माझे मेव्हणे नामे नितीन बबन बैलभरे (वय 43 वर्ष) रा. चऱ्होली ता. हवेली, जि. पुणे व त्यांचे मित्र दिपक गणपत करंजकर (वय 47 वर्ष) रा. चऱ्होली ता. हवेली, जि. पुणे असे दोघे हिरो होन्डा स्पेन्डर मो. सायकल नं एम. एच. 14 एफ. वाय. 5377 हि वरून सासवड-जेजुरी रोडने सासवड बाजुकडुन जेजुरी बाजुकडे येत असताना त्यांचे पाठीमागुन जेजुरी बाजुकडे येणारी होन्डाई कंपनीची आवरा कार नं एम. एच. 46 सी. एल. 2458 वरील चालक नामे सतीश बाळासाहेब कदम (वय 48 वर्ष) व्यवसाय – डायव्हर मुळ रा जोशी बिल्डींग रूम नं 3 बेलग्रामी रोड गणेशबाग लेन कुर्ला पश्चिम मुंबई सध्या रा बल्लाळेष्वर हौसिंग सोसायटी एस आर ओ चर्चरोड करंजगाव कर्जुरमार्ग ईस्ट मुंबई यांने त्यांचे ताब्यतील कार हयगयीने, अविचाराने, भरधाव वेगात चालवुन, रस्त्याचे परिस्थीकडे दुर्लक्ष करून चालवुन समोर चाललेले हिरो होन्डा स्प्लेन्डर मो. सायकल नं एम. एच. 14 एफ. वाय. 5377 ला ठोस बसुन अपघात होवुन सदर अपघातात मो. सायकल चालक माझे मेव्हणे नामे नितीन बबन बैलभरे (वय 43 वर्ष) रा. चऱ्होली ता हवेली जि पुणे यांना गंभीर व किरकोळ दुखापती होवुन त्यांचे मृत्युस तसेच दिपक गणपत करंजकर (वय 47 वर्ष) रा. चऱ्होली, ता. हवेली जि. पुणे यांचे गंभीर व किरकोळ दुखापतीस तसेच दोन्ही वाहनांचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे म्हणुन माझी होन्डाई कंपनीची आवरा कार ने एम. एच. 46 सी.एल.2458 वरील चालक नामे सतीश बाळासाहेब कदम (वय 48 वर्ष) व्यवसाय डायव्हर मुळ रा जोशी बिल्डींग रूम नं 3 बेलग्रामी रोड गणेशबाग लेन कुर्ला पश्चिम मुंबई सध्या रा बल्लाळेश्वर हौसिंग सोसायटी एस आर ओ चर्चरोड करंजगाव कर्जुर मार्ग ईस्ट मुंबई याचे विरुदध कायदेशीर फिर्याद आहे. यावरून जेजुरी पोलीस स्टेशन गु.र. नं 389/2025 BNS कलम 106 (1), 125(a), 125(b),281,324(2-6) मो वा का क 184 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौज पिंगळे हे करत आहेत.



