क्राईम

News: जेजुरी: शासकीय कामांसाठी लाच देणे-घेणे गुन्हा: स.पो.आ. भारती मोरे

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : कोणत्याही शासकीय कामांसाठी लाच देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे स. पो.आ. भारती मोरे यांनी येथे केले. जेजुरी येथे आयोजित जनजागृती उपक्रमात श्रीमती मोरे बोलत होते.

श्रीमती भारती मोरे म्हणाल्या, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध जनजागृती उपक्रम होत आहेत. कोणत्याही शासकीय कामासाठी आपण लाच देणे बंद करावे व संबंधित गैरप्रकार घडत असेल तर त्याबाबत तत्काळ आमच्या विभागात माहिती द्यावी. ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांनी देखील अधिकाधिक नागरिकांना जागृत करावे, असे आवाहन श्रीमती भारती मोरे यांनी केले.

जेजुरी नगरपरिषद, तलाठी कार्यालय, मंडल अधिकारी कार्यालय तसेच पोलिस ठाण्यात जाऊन पत्रके भिंतीवर चिकटवण्या आली. तसेच जेजुरी नागरिकांना याबाबत जनजागृती करण्यात आली. त्यासाठी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

तसेच भविष्यात लोकसेवक शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे (मो.क्र. 9823167154), अपर पोलीस अधीक्षक 1 अजीत पाटील, ला.प्र.वि., पुणे (मो.क्र. 9029030530), दयानंद गावडे, सहायक पोलीस आयुक्त/पोलीस उप-अधीक्षक, (प्रशासन), ला.प्र.वि, पुणे, (मो. क्र. 9423884745) यांनी केले आहे.

1) अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे- दुरध्वनी क्रमांक-020-26122134, 26132802, 26050423, 9403781064

2) व्हॉट्स अॅप क्रमांक 9403781064 (पुणे), 9930997700 (मुंबई)

३) ई-मेलआयडी – पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in

4) वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in

5) ऑनलाईन अॅप तक्रार – www.acbmaharashtra.net.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button