Crime News: जेजुरी: नाझरे येथे दोन ठिकाणी चोरी; 2,24,000/- रु. किंमतीचा ऐवज लंपास

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील नाझरे कडेपठार गावात दोन घरातील कडी कोयांडे तोडून अज्ञात चोरट्यानी सुमारे सव्वा दोन लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील नाझरे कडेपठार गावातील सोमनाथ अशोक अमाराळे यांच्या देवघरातील दाराचे कडी तोडून अज्ञात चोरट्यानी लोखंडी कपाटातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, चांदीच्या पट्ट्या व वाळे तसेच कपाटातील सुमारे 18 हजार रुपये लंपास केले.
तसेच नाझरे गावातील सुभाष रघुनाथ नाझिरकर यांच्या घराचे कडी तोडून कपाटातील सोन्याचे, गंठण, मनी, कर्णफुले व रोख दोन हजार रुपये चोरून नेले. दोन्ही घरातील एकूण दोन लाख 24 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा फौज कारंडे करीत आहेत.



