क्राईम

Crime News:जेजुरी: दौंडज मध्ये भरदिवसा दरोडा; जेजुरी पोलीसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करत ड्रोनच्या मदतीने शेतात लपलेल्या चोरांना केले जेरबंद

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या दौंडज गावामधील कदम वस्तीवर दरोडा टाकून रोख रक्कम 50 हजार रुपये चोरुन तीन चोरांनी पोबारा केला. मात्र स्थानिक तरुणांनी त्यांच्या पाटलाग सुरु केला. नीरा नजीकच्या थोपटेवाडी रेल्वे गेट बंद असल्याने चोरांची अडचण झाली. त्यांना थांबावं लागले. यादरम्यान दौंडज पासून चोरांचा पाठलाग करत आलेल्या तरुणांनी चोरांना पकडले.  मात्र या तरुणांना पिस्तूलचा घाक दाखवून यातील दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तर वाहन चालकाला त्यांनी पकडून ठेवले. याबाबतची माहिती जेजुरी पोलीसांना मिळताच जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे त्याचबरोबर पीएसआय सर्जेराव पुजारी यांनी आपल्या टीम सह घटनास्थळाकडे धाव घेतली.

  पुणे पंढरपूर मार्ग ते जेऊर यादरम्यानच्या रस्त्याच्याकडेला असलेल्या शेतामध्ये हे चोर लपून बसल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर दौंडज, वाल्हे, जेऊर, पिसुर्टी, पिंपरे, नीरा या गावातील दीडशे ते दोनशे तरुण त्या ठिकाणी आले आणि संपूर्ण शेतीला वेढा घालून उभे राहिले. त्यामुळे चोरांना पळून जाणे शक्य झाले नाही.

या दरम्यान पोलिसांनी ड्रोन आणले. ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण शेतीचा सर्वे करण्यात आला. उसाचे क्षेत्र असल्याने पोलिसांना चोरांना शोधणे अवघड होते. त्याचबरोबर त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती. त्यामुळे कोणतीही धोका न घेता पोलिसांनी तरुणांना फक्त राखण करा, कोणीही उसाच्या शेतामध्ये जाऊ नये असे निर्देश दिले होते. ड्रोनच्या कॅमेऱ्यामध्ये हे चोर उसाच्या शेतामध्ये असल्याचे दिसून आले आणि यानंतर पोलीस आणि तरुणांनी जाऊन या चोरांच्या मुसक्या आवळल्या.

 जेजुरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात असलेले लखनसिंग रतपुतसिंग धुधानी (वय 35 वर्षे), बेहतसिंग शामसिंग कल्याणी (वय 30 वर्षे), रत्नेश राजकुमार पुरी (वय 23 वर्षे) रा. संभाजीनगर यांना ताब्यात घेतले असल्याचे सांगितले. या चोरांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे अधिकचा तपास करण्यात येत असल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे यांनी माध्यमांना दिली आहे.

चोरांना पकडण्यासाठी पोलीस संदीप मदने, केशव जगताप, संदीप भापकर, विठ्ठल कदम, दशरथ बनसोडे, रविराज कोकरे, घनश्याम चव्हाण, प्रसाद कोळेकर आदींनी सहभाग घेताला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button