क्राईम

Crime News: जेजुरी येथे सापडला अनोळखी पुरुष मृतदेह

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत अनोळखी पुरुष मृतदेह सापडला असून याबाबत संदीप दशरथ जगताप (वय ५० वर्षे) व्यवसाय शेती रा. जुनी जेजुरी ता. पुरंदर जि.पुणे यांनी पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०९/०९/२०२५ रोजी १२.३० वा. सुमा मी माझे शेतात जाणेकामी जुनी जेजुरी येथुन कोळविहीरे गावाकडे जात असताना जुनी जेजुरी येथील कोळविहीरे चौकात, पुणे पंढरपुर महामार्गावरील पुलाखाली एक इसम कोणतीही हालचाल होत नसलेल्या स्थितीत दिसुन आला. त्यांनतर मी जवळ जावुन पाहणी केली असता सदर इसमाची काही एक हालचाल होत नव्हती. त्यामुळे माझी खात्री झाली की, सदर इसम मयत झालेला आहे. मी त्याची आजुबाजुस चौकशी केली असता त्यास कोणीही ओळखत नव्हते व त्याची कोणही नातेवाईक देखील जेजुरी परीसरात मिळुन आले नाहीत.

यामुळे सदर अनोळखी पुरूष वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे नाव पत्ता माहीती नाही. हा मयत झालेला असुन त्याची पुढील योग्य ती तजवीज होणेस विंनती आहे माझा वरील संगणकावर घेतलेला खबरी जबाब मी वाचुन पाहीला तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर आहे.

सदर मयताची माहिती असल्यास जेजुरी पोलीस स्टेशनशी संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button