क्राईम

News: सदर व्यक्तीस ओळखत असल्यास जेजुरी पोलीस स्टेशनची संपर्क साधावा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक 06/ 07/2025 रोजी सकाळी 11:00 वाजण्याचे सुमारास जेजुरी येथे निरा जेजुरी रोडवर पेशवे लॉज च्या जवळ विठ्ठल मंदिरा समोर एक अनोळखी इसम वय अंदाजे 50 वर्ष हे रस्ता ओलांडत असताना त्यांना नीरा बाजूकडून येणारे एसटी बसची ठोस बसून अपघात झाला आहे. सदर अपघातात ते जखमी झाल्याने त्यांना उपचार कमी ससून हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले होते. ते 13/7/2025 रात्री 10:00 वा. मयत झाले आहेत.

सदर मयताचे पोस्टमार्टम ससून हॉस्पिटल पुणे येथे करण्यात आले आहे . अंगात खाकी रंगाचा फुल भायाचा शर्ट व पांढरे रंगाची पॅन्ट असून गळ्यात लाकडाच्या मण्याची माळ आहे. सदर बाबत एसटी चालक श्रीकृष्ण महादेव मेश्राम यांनी जेजुरी पोलीस येथे यांनी जेजुरी पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून त्यावरून जेजुरी पोलीस स्टेशन मोटार अपघात रजिस्टर नंबर 08/25 प्रमाणे अपघात दाखल होता. सदर अपघाताचे तपासावरून दिनांक 08/08/2025 रोजी जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 274/25 BNS 106(1), 125(a)125(b)MV.Act 184 प्रमाणे दाखल करण्यात आले आहे.

सदर मताचा तपास स.पो.नि. दीपक वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नांदे ब.न. 2359 हे करीत आहेत. तरी सदर मायता बाबत काही माहिती मिळाल्यास जेजुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button