क्राईम

Crime News: जेजुरी पोलीसांकडून जुगार अड्ड्यावर कारवाई

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी गावच्या हद्दीत व्हिआयपी चहा चे टपरी मागील एका पडक्या बिल्डींग मध्ये जुगार अड्ड्यावर जेजुरी पोलीस स्टेशन कडून कारवाई करण्यात आली आहे. याबाबत फिर्यादी गणेश बाळु गव्हाने पो.काँ.ब.न.173 नेमणुक जेजुरी पोलीस स्टेषन ता.पुरंदर जि.पुणे यांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 03/08/2025 रोजी सांयकाळी 19: 30 वा.सुमा मौजे जेजुरी गावच्या हद्दीत व्हिआयपी चहा चे टपरीच्या मागील एका पडक्या बिल्डींग मध्ये आरोपीत नामे 1) सुदाम बबन घाडगे (वय 54 वर्षे) रा. जेजुरी ता. पुरंदर, जि. पुणे 2) अजित मोहन हलकुंडे (वय 29 वर्षे) रा. विदयानगर जेजुरी ता. पुरंदर, जि पुणे 3) सोमनाथ वसंत जगताप (वय 47 वर्षे) रा. विदयानगर जेजुरी ता. पुरंदर, जि. पुणे 4) शिवानंद शरणाप्पा पँटी (वय 61 वर्षे) रा. खोमणेवस्ती,जेजुरी ता. पुरंदर, जि. पुणे 5) अनिल सिताराम सावंत (वय 38 वर्षे) रा विदयानगर जेजुरी ता पुरंदर जि पुणे 6) आंनद धोंडीराम चौरे (वय 60 वर्षे) विदयानगर जेजुरी ता पुरंदर जि पुणे 7) दुर्गाप्पा हनुमंत धोत्रे (वय 46 वर्षे) रा.दवणेमऴा जेजुरी ता.पुरंदर जि.पुणे हा आपले ताब्यात जुगार खेळण्याची साधने जवळ बाळगुन जुगार खेळवत असताना रोख रक्कमसह असा एकुण 2000 -00 रू.किंमतीचा मालासह मिळुन आले आहेत. म्हणुन माझी यातील आरोपी क्र.1 ते 7 याचेविरूध्द म.जु.का.क 12 (अ) प्रमाणे कायदेषीर फिर्याद आहे. यावरून जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं 272/2025 म.जु.का.क 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार पो हवा/414 पिंगळे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button