Crime News: सख्या भावाने केलाच सख्या भावाचा खुन जेजुरी पोलीसानी केला खुनाचा 24 तासात उलघडा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक 01/8/2025 रोजीचे सकाळचे सुमारास इसम नामे ज्ञानदेव लक्ष्मण भामे (वय 82 वर्षे) रा मावडी.क.प ता. पुरंदर जि.पुणे याचे मयत मौजे मावडी क.प ता. पुरंदर जि.पुणे गावचे हदीत दाजीरचे शेतात बाजरीचे पिकात मिळुन आलेबाबत नातेवाईकांनी खबर दिली होती. त्यावरून जेजुरी पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयत रजिस्टरी नोद करणेत आली होती.

दाखल मयताचे तपासामध्ये गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, इसम नामे ज्ञानदेव लक्ष्मण भामे (वय 82 वर्षे) रा मावडी.क.प ता. पुरंदर जि.पुणे यांचा व त्याचा सख्खा लहान भाउ नामे चांगदेव लक्ष्मण भामे याचेत जमीनीतील रस्त्यावरून वाद होता. त्याअनुशंगाने तात्काळ चांगदेव लक्ष्मण भामे (वय 68 वर्षे) रा. मावडी क.प ता. पुरंदर जि.पुणे यास तपासकामी ताब्यात घेवुन चौकशी केली. परंतु सुरूवातीस त्यांने झाले प्रकाराबाबत सांगणेस नकार दिला. परंतु त्यास पोलीसी खाक्या दाखविलेनंतर त्यांने त्याचा सख्खा मोटा भाउ ज्ञानदेव लक्ष्मण भामे (वय 82 वर्षे) रा. मावडी.क.प ता. पुरंदर जि.पुणे याने जमीनीत जाणेसाठी रस्ता आडवित असलेने व त्रास देत असलेने त्यास हाताने लाथा बुक्याने व लाकडी दांडक्याने मारहाण केली त्यामध्ये मयताचे डोकीत मारहाण केलेचे सांगितले. तसेच वैदयकीय अधिकारी ग्रामीण रूग्णालय जेजुरी यांनी देखील पोस्ट मार्टेम करता मयताचे डोकीस गंभीर जखम झालेचे सांगितले. त्यावरून – ज्ञानदेव लक्ष्मण भामे (वय 82 वर्षे) रा मावडी.क.प ता. पुरंदर जि.पुणे याचा त्याचा सख्खा लहान भाउ चांगदेव लक्ष्मण भामे (वय 68 वर्षे) रा. मावडी क.प ता. पुरंदर जि.पुणे यांनेच जमीनीचे रस्त्याच्या वादाचे कारणावरून खुन केलेचे उघड झाले असुन, आरोपी चांगदेव लक्ष्मण भामे वय 68 रा. मावडी क.प ता. पुरंदर जि.पुणे यास सदर गुन्हयाचे कामी दिनांक 2/8/2025 रोजी रात्रौ अटक करणेत आली आहे.

सदर कारवाई संदीपसिह गिल, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिराजदार, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग बारामती, तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड, याचे मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनकडील नेमणुकीचे दिपक वाकचौरे, सहायक पोलीस निरीक्षक, जेजुरी पोलीस स्टेशन, महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक, नामदेव तारडे, पोलीस उपनिरीक्षक, सर्जेराव पुजारी पोलीस उपनिरीक्षक, दशरथ बनसोडे पो.हवा.ब.न 1418, विठठल कदम पो.हवा.ब.न 1839 मुनीर मुजावर पो. हवा.यन 3310, संदीप भापकर पो.हवा.ब.न 2404, हेंमत भोंगळे पोलीस कॉन्स्टेबल याचे पथकाने केली असुन, सदर गुन्हयाचा पुढील तपास महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक हे करीत आहे.



