Crime News: जेजुरी: घराचे कुलूप तोडून घरातील साहित्य व रोख रक्कम लंपास

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील माळशिरस येथे घराचे कुलूप तोडून घरातील साहित्य व रोख रक्कम चोरी झाले असून याबाबत फिर्यादी मोहन पंडुरंग जाधव (वय 47 वर्ष), व्यसाय – बिजनेस, रा. माळशिरस ता. पुरंदर, जि. पुणे यांनी आरोपी जयकर धोंडीराम लाड रा. नरसिंहपुर, ता. वाळवा इस्लामपुर, जि. सांगली याच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 16/06/2025 रोजी साकाळी 10:00 ते दुपारी 14:00 वा चे दरम्यान इसम नामे 1) जयकर धोंडीराम लाड रा. नरसिंहपुर ता. वाळ्या इस्लामंपुर, जि. सांगली याने आमचे माळशिरस ता. पुरंदर, जि. पुणे येथील राहते घराचा दरवाजाचे कुलूप तोडुन घरातील गेला माल

1) 5000/- रु किमतीची तांब्याची व पीतळेची भांडी, व लोखंडी कोयते जु. वा. कि. अं.
2)50000/-रु रोख रक्कम त्याचेमधे 500/- रु दराच्या 100 नोटा
3)15000/- रु किमतीची एक हीरो होंडा कपनीची पेंशन मोटरसायकल तीचा नं एम. एच 12 सी. यु 8166
असा एकुन 70000/- रुपये वरील वर्णनाचे साहीत्य रोख रक्कम व मोटार सायकल चोरी करून घेवुन गेला आहे. यावरून जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 244/2025 भारतीय न्याय संहीता कायदा कलम 306 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहया/1112 चितारे हे करीत आहेत.



