क्राईम

Accident News: जेजुरी: मोटार सायकल व टीपर अपघातात एक जणाचा मृत्यू

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील कोळविहीरे गावचे हद्दीत जाधववस्ती येथील महर्षी वाल्मीकी विदयालय शाळेपासुन जेजुरी बाजुकडे 100 मीटर अतंरावर कोळविहीरे जेजुरी बाजुकडे जाणारा 21 फुटी डांबरी रोडवर मोटार सायकल राँग साईडला जावुन समोरून ठोस देवुन अपघात झाला असून याबाबत फिर्यादी संदीप नारायण भापकर पो.हवा.ब.न 2404 नेमणुक जेजुरी पोलीस स्टेशन यांनी आरोपी गांधी नेपाळ राठोड (वय 47 वर्षे) रा.नाझरे क.प.ता.पुरंदर जि.पुणे याच्या विरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 17/6/2025 रोजी दुपारी 4/00 वा. सुमा मौजे कोळविहीरे गावचे हदीत जाधववस्ती येथील महर्षी वाल्मीकी विदयालय शाळेपासुन जेजुरी बाजुकडे 100 मीटर अतंरावर कोळविहीरे जेजुरी बाजुकडे जाणारा 21 फुटी डांबरी रोडवर इसम नामे गांधी नेपाळ राठोड रा.नाझरे क.प. ता.पुरंदर, जि. पुणे याने त्याचे ताब्यातील होडा शाईन मोटार सायकल नंबर एम.एच.12 डब्लु एन 6883 ही कोळविहीरे बाजुकडुन जेजुरी बाजुकडे घेवुन जात असताना ती हयगयीने, अविचाराने, रस्त्याचे नियमाकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगात चालवुन जेजुरी बाजुकडुन येणारे टिपर वाहन क्रमाक एम.एच 12 डब्लु जे 9677 हीस राँग साईडला जावुन समोरून ठोस देवुन, स्वतःचे डोक्याला, तोंडाला, उजव्या हाताला किरकोळ व गंभीर दुखापत करून स्वतःचे मृत्युस व मोटार सायकलचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे. म्हणुन माझी होडा शाईन मोटार सायकल नंबर एम.एच. 12 डब्लु एन 6883 वरील चालक गांधी नेपाळ राठोड रा.नाझरे क.प. ता.पुरंदर जि. पुणे याचेविरूध्द तक्रार आहे. यावरून जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 229/2025 भारतीय न्याय संहीता कलम 106(1), 125 (अ ब), 281, 324(2) मो वा काक 184 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हवा /3310 मुजावर (मो.नं.+91 98229 44011) हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button