क्राईम

Accident News: जेजुरी- सासवड महामार्गावर अपघात; एक जणांचा मृत्यू

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी येथील एस. टी स्टॅन्ड समोर जेजुरी सासवड रोडचे मध्यभागी असणारे रोड दुभाजका जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणचा मृत्यू झाला असून याबाबत फिर्यादी वैजनाथ बाबुराव जाधव (वय 42 वर्ष) व्यवसाय बांधकाम बिगारी रा. महागांव ता. पुर्णा जि. परभणी सध्या रा. वाघोली ता. हवेली जि. पुणे यांनी आरोपी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालक याच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा चुलत भाऊ विष्णु मारूतराव जाधव (वय 31 वर्ष) महागांव ता. पुर्णा जि. परभणी हा रस्ता ओलांडत असताना त्यास कोणत्या तरी अज्ञात वाहनांवरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हयगयीने अविचाराने भरधाव वेगात, रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करून त्याचे ताब्यातील वाहन चालवुन माझा चुलत भाऊ विष्णु जोरात धडक देवुन त्याचे डोक्यावरून अंगावरून वाहनाचे चाक जावुन त्यात तो किरकोळ व गंभीर दुखापती होवुन त्याचे मुत्युस कारणीभुत झाला आहे. म्हणुन माझी अज्ञात वाहनांवरील अज्ञात चालकांचे विरूध्द कायदेशीर फिर्याद आहे. यावरून जेजुरी पोलीस स्टेशन गु.२.नं. 227/2025 भारतीय न्याय संहीता कलम 106 (1), 125 (अब), 281 मो वा काक 184, 134/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा अधिकता पास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा पिंगळे/414 हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button