Accident News: जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात; 8 जण ठार तर 5 जण गंभीर जखमी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी मोरगाव रोड वर किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाबा समोर एक भीषण अपघात झाला असून या अपघातात आठ जण ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की पुण्याहून मोरगाव कडे जाणारी स्वीफ्ट डिझायर कार (क्र. एम एच 42 ए एक्स 1060) जेजुरीकडून मोरगाव कडे जात असताना श्रीराम ढाब्या समोर पिकअप टेम्पोला (क्र. एम एच 12 एक्स एम 3694) मधील साहित्य खाली करीत असताना जोरदार धडक दिली.

धडक एवढी जोरदार होती की शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या एका कार (क्र.एम एच 12 टी के 9483) ला स्वीफ्ट कार जाऊन धडकली. या भीषण अपघातात टेम्पो मधील वस्तू खाली करणारे दोघेजण, श्रीराम ढाब्यासमोर उभे असणारे तिघे तर स्वीफ्ट डिझायर कार मधील तिघे जण जागेवरच ठार झाले आहेत. तर दोन मुले, एक महिला, दोन पुरुष असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.




