Crime News: जेजुरी खंडोबा गडावर दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र चोरीस

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): तीर्थक्षेत्र जेजुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गळ्यातील मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेऊन चोरीस गेल्याची घटना घडली असून याबाबत फिर्यादी प्रगती सुनिल मुठे (वय 19 वर्षे) धंदा घरकाम रा. प्लॅट नं 303 साईकृपा बिल्डींग घणसोली नवी मुंबई जि. ठाणे यांनी आरोपी पुजा अक्षय पवार (वय 20 वर्षे) रा. लोणंद रेल्वेस्टेषन जवळ ता. खंडाळा, जि. सातारा हिच्या विरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 08/06/2025 रोजी 10:30 या सुमारास मी व माझे घरातील लोक मुंबई वरून जेजुरीला ता. पुरंदर, जि. पुणे येथे खंडोबा देवाचे दर्शनासाठी आलो होतो तेव्हा जेजुरी खंडोबा मंदिर परीसरात महीला नामे पुजा अक्षय पवार (वय 20 वर्षे) रा. लोणंद रेल्वेस्टेषन जवळ ता. खंडाळा, जि. सातारा हिने गर्दीचा फायदा घेवुन माझे गळयातील मनी मंगळसुत्रातील दोन सोन्याच्या वाट्या व आठ मनी अंदाजे एकुण 5 ग्रॅम वजानाचे जु. अंदाज किंमत 50,000/- रू कि. चा वरील वर्णानाचे सोन्याचे मनी मंगळसुत्र चोरी करून नेले आहे. म्हणुन माझी तिचे विरुध्द कायदेशीर तक्रार आहे.यावरून जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 205/2025 भारतीय न्याय संहीता कलम 2023 चे कलम-303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हवा/2359 नांदे हे करीत आहेत.