Crime News: जेजुरी येथे आढळला अनोळखी पुरुष मृतदेह

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक 03/06/2025 रोजी सकाळी 08:00 वाजण्याचे सुमारास जेजुरी बारसोडे नगर चे पाठीमागील डोंगर माथ्यावर वन विभागाच्या जागेत एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 40 वर्ष याचा मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत मिळून आला आहे.

सदर मयताचे पोस्टमार्टम जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांनी जागीच करून सदर मयत बॉडी डीकंपोज झाली असल्याने जागीच दफन करण्यात आली आहे. सदर मायताचे डोके व चेहरा पूर्णपणे काळसर पडून सडलेले दिसत आहे. अंगात पांढरे रंगाचा फुल भायाचा शर्ट व निळे रंगाची पॅन्ट असून सदर बाबत जेजुरी पोलीस येथे ऋतिक सिद्धार्थ बनसोडे राहणार जेजुरी विद्यानगर ता. पुरंदर, जिल्हा पुणे, यांनी जेजुरी पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून त्यावरून जेजुरी पोलीस स्टेशन अकस्मात मयत रजिस्टर नंबर 59/24 बी.एन.एस.एस.194 प्रमाणे मयत दाखल करण्यात आले आहे.

सदर मताचा तपास स.पो.नि. दीपक वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नांदे ब.न. 2359 हे करीत आहेत तरी सदर मयता बाबत काही माहिती मिळाल्यास जेजुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा. पोलीस हवालदार नांदे मो.न.- 9881141635