Crime News: जेजुरी येथे आढळला अनोळखी महिला मृतदेह

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दि 03/05/2025 रोजी सकाळी 08/00 वाजण्याचे सुमारास जेजुरी गावचे हद्दीत धालेवाडी रोडला गणेश मेडिकल समोर एक अनोळखी स्त्री वय अंदाजे 65 वर्ष याचा मृतदेह मिळून आला आहे. सदर मयताचे पोस्टमार्टम जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले असून त्याचा मृतदेह सध्या जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे शीतगृहात ठेवण्यात आला आहे.

सदर मयताचे डोकिस काळे पांढरे केस,टककल पडलेले आहे, अंगात हिरवट रंगाची साहावार साडी, गुलाबी रंगाचा परकर,काळा ब्लाऊज असून सदर बाबत जेजुरी पोलीस येथे अविनाश बाळासो मदने, वय 42 वर्ष, रा जेजुरी विदयानगर पुरंदर, जिल्हा पुणे, यांनी जेजुरी पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून त्यावरून जेजुरी पोलीस स्टेशन अकस्मात मयत रजिस्टर नंबर 50/25 बी.एन.एस.एस.194 प्रमाणे मयत दाखल करण्यात आले आहे.

सदर मताचा तपास स.पो.नि. दीपक वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पिंगळे ब.न. 414 हे करीत आहेत तरी सदर मयता बाबत काही माहिती मिळाल्यास जेजुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा.



