क्रीडा

Crime News: महिलांचे दागिने हिसकावून जबरी चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद; एकूण 7,16,793/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जुन्नर पोलीस स्टेशन गुरनं. १०४/२०२५ BNS ३०९(४), ३ (५) प्रमाणे दि. ११/०३/२०२५ रोजी गुन्हा घडलेला असून सदर गुन्हयातील फिर्यादी इंदूबाई विठ्ठल पानसरे (वय ६० वर्षे), व्यवसाय शेती, घरकाम, रा. पिंपळगाव सिद्धनाथ ता. जुन्नर जि. पुणे या पिंपळगाव सिद्धनाथ ते गणेशखिंड रोडने जुन्या घराकडे पायी जात असताना मोटार सायकलवरील दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीचे गळयातील मंगळसुत्र व माळ असा एकूण १,८०,०००/- किंमतीचे सव्वा दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले होते. त्याबाबत फिर्यादीने जुन्नर पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे.

सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने समांतर रित्या सुरू करणेत आला होता, तपासा दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासणेत आले, चोरटयांनी गुन्हा करते वेळी स्प्लेंडर मोटार सायकलचा वापर केल्याचे निष्पन्न करून सदरची मोटार सायकल ही शिरूर बाजुकडे गेली असल्याचे तपासात दिसून आले. त्याअनुषंगाने पथकाने शिरूर परिसरातील गोपनीय बातमीदाराकडून बातमी काढून संशयित मोटार सायकल ही इसम नामे अनिल सोमनाथ गव्हाणे व अनिल नारायण गव्हाणे हे वापरत असून ते दानेवाडी परिसरात असतात. अशी बातमी मिळाल्याने बातमीचे आधारे पथकाने दि. २८/०३/२०२५ रोजी शिरूर परिसरात सापळा लावून आरोपी नामे १) अनिल सोमनाथ गव्हाणे (वय ३१ वर्षे), रा. गव्हाणेवाडी ता. श्रीगोंदा जि अहिल्यानगर, २) अनिल नारायण गव्हाणे (वय २५ वर्षे) रा. दाणेवाडी ता. श्रीगोंदा जि अहिल्यानगर यांना शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्यांना विश्वासात घेवनू चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले असून त्याचबरोबर त्यांनी जुन्नर, शिक्रापूर, शिरूर, आळेफाटा पो स्टे हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांचेकडून त्यांनी गुन्हयात वापरलेली मोटार सायकल व ८ तोळे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे ७,१६,७९३/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. दोन्ही आरोपींना जुन्नर पो स्टे चे ताब्यात देण्यात आलेले होते. आरोपींना न्यायालयाने त्यांची सध्या न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे.

आरोपींकडून उघडकीस आलेले गुन्हे

१) जुन्नर पोलीस स्टेशन 104/2025 BNS 309 (4),3 (5)

२) जुन्नर पोलीस स्टेशन ८९/२०२५ BNS ३०४(१), ३०४(२), ३(५)

३) शिक्रापूर पोलीस स्टेशन 85/2025 BNS 319(2), 204(2), 3(5)

४) शिरूर पोलीस स्टेशन 215/2025 BNS 309(4), 3(5)

५) आळेफाटा पोलीस स्टेशन 19/2025 BNS 309(2), 204(2),3(5)

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली परि. उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री धीरबस्सी जुन्नर पो स्टे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, जुन्नर पो स्टे चे पो नि किरण अवचर, स्थागुशाचे पोसई अभिजीत सावंत, जुन्नर पोस्टेचे सपोनि अरविंद गटकुळ, स्थागुशाचे पोलीस अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजु मोमीण, सागर नामदास, वैभव सावंत, निलेश सुपेकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button