Crime News: जेजुरी: विहिरीचे पाण्याच्या पाळीचे कारणावरून चाकूने वार करून खून

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दित आज दि.१५/०२/२०२४ रोजी मौजे आंबळे ता. पुरंदर, जि. पुणे गावचे हददीत जगतापवस्ती येथे जमीन गट नं. ८४८ मधील विहिरीचे पाण्याचे पाळीचे कारणावरून आरोपी नामे बाळुदास काळुराम जगताप रा. आंबळे जगतापवस्ती ता. पुरदर, जि. पुणे याने अविनाश मल्हारी जगताप (वय ४० वर्षे) यांला अंगावर धावुन येवुन हाताने मारहाण करून खिशातील चाकु काढुन अविनाश याचे वर चार ते पाच वेळा वार करून त्याचा खुन केला आहे.

तसेच गणेश जगताप व अविनाश याचे वडिल मल्हारी जगताप यांचेवर वार करून त्यांना ही गंभीर दुखापती केल्या आहेत म्हणुन जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं ५५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३,११८(१), ११५ (२), ३५२,३५१ (२) (४) सौरभ दत्तात्रय जगताप (वय २८ वर्ष) व्यवसाय शेती रा. आंबळे जगतापवस्ती ता. पुरंदर, जि. पुणे यांनी फिर्याद दिली असुन सदर गुन्हयातील आरोपी ताब्यात घेतला आहे.

सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड मा.तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, जेजुरी पोलीस स्टेशन दिपक वाकचौरे हे करत आहेत.



