News: तीर्थक्षेत्र जेजुरी कडेपठारावर ‘गोशाळेचे’ भूमिपूजन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज): श्री खंडेराय आणि म्हाळसादेवी यांच्या शुभविवाह सोहळा, शनी प्रदोष तसेच अयोध्या निवासी प्रभू रामचंद्राच्या भव्य मंदिरातील रामलल्लांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रथम वर्षपूर्ती दिन अश्या त्रिवेणी आणि अलौकिक मुहूर्ताच्या अनुशंघाने दि. ११/१/२०२५ श्री खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी यांच्या वतीने तीर्थक्षेत्र श्री कडेपठारावर ‘गोशाळा’ भूमिपूजन सोहळा, गोपूजन सोहळा आणि सामूहिक महाआरती सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या सोहळ्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे परागजी गोखले, दिपकजी गोखले, विनीत पाटील, ह. भ. प. डॉ. दत्तात्रय चोरघे महाराज, ख्यातनाम शिल्पकार आणि साकुर्डे येथील श्री स्वामी समर्थ मठाचे विश्वस्त दीपक थोपटे, लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट ,पुणे चे विश्वस्त दिलीपजी थोरात, श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान, विरचे प्रसाद गुरुजी, कोडित देवस्थानचे संतोष बडदे, श्री भुलेश्वर देवस्थानचे विनय गुरव, तुकाई माता देवस्थानचे तुपे, श्री माळी महाराज मठ, सोमवारपेठ पुणे यांचे थेट वंशज बरके काका, त्यांचे संपूर्ण कुटुंब, भाई जाधव, सोरतापेश्वर मंदिराचे विश्वस्त भाऊसाहेब चौधरी, नागनाथपार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रितेश केदारी, अनुप कवडे, अथा कामठे, अवंतिका शिवरकर, आभा जेजुरीकर, उमेश गायकवाड आणि कडेपठार देवस्थानतर्फे मयूर दिडभाई, दादा असवलीकर, कैलास बारभाई, मनोज आगलावे, मंगेश जेजुरीकर, दीपक खोमणे, धनंजय नाकाडे, प्रतीक खोमणे, अनिकेत कुदळे, मयूर खोमणे, मयूर कांबळे, करण दरेकर, तेजस दरेकर उपस्थित होते.

तीर्थक्षेत्र श्री कडेपठारावर भूपाळी नंतर मुख्य मंदिराबाहेर गोमातांचे मनोभावे पूजन करण्यात आले, त्यांना डाळ गुळाचा नैव्यद्य दाखवून घास भरविण्यात आला, त्यानंतर न्यासातफे ज्याठिकाणी गोशाळा बांधण्यात येणार आहे त्यापवित्र ठिकाणी सर्व मान्यवरांच्या वतीने भूमी पूजन कारणात आले यावेळी न्यासातर्फे प्रस्तावित विकास कामांविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली आणि एक उत्कृष्ठ गोशाळा कशी असावी याविषयी काही संकल्प देखील करण्यात आले. सर्व मान्यवरांनी त्यानंतर न्यासाचे “अशोकवन देवराईत” देवराईबाबत माहिती घेऊन थोडावेळ श्रमदान देखील केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री खंडेरायाची दुपारतीची महापूजा संपन्न झाली आणि त्यानंतर लगेचच महाराष्ट्र मंदिर महासंघाने संकल्पित केलेल्या महाआरती मध्ये जमलेल्या भाविकांसह सर्व मान्यवरांनी मनोभावे सहभाग घेतला. शिर्डी येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात झालेल्या ठरावा नुसार या महारातीचे आयोजन करण्यात आले होते.
न्यासातर्फे गेली अडीच वर्षे तीर्थक्षेत्र श्री कडेपठारावर दैनंदिन अन्नदानाचे आयोजन चालू आहे त्याच अन्नछत्रात सर्व मान्यवरांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला. मयूर दिडभाई यांनी न्यासाच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून सोहळ्याची सांगता करण्यात आली.