Crime News: जेजुरी येथे सापडला अनोळखी पुरुष मृतदेह

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक 13/12/2024 रोजी दुपारी 04:30 वाजण्याचे सुमारास जेजुरी एस टी स्टँड परिसरात रोडचे बाजूला एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 55 ते 60 वर्ष याचा मृतदेह मिळून आला आहे. सदर मयताचे पोस्टमार्टम जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले असून त्याचा मृतदेह सध्या जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे शीतगृहात ठेवण्यात आला आहे.

सदर मायताचे डोकिस काळे पांढरे केस दाढी वाढलेली अंगात फिक्कट गुलाबी रंगाचा टी शर्ट व खाकी कलरची पॅन्ट असून सदर बाबत जेजुरी पोलीस येथे दगडू धर्मजी बुनगे, वय 56 वर्ष, व्यवसाय वाहतूक नियंत्रक जेजुरी, रा. वाल्हे कामटवाडी पुरंदर, जिल्हा पुणे, यांनी जेजुरी पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून त्यावरून जेजुरी पोलीस स्टेशन अकस्मात मयत रजिस्टर नंबर 125/24 बी.एन.एस.एस.194 प्रमाणे मयत दाखल करण्यात आले आहे.

सदर मताचा तपास स.पो.नि. दीपक वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नांदे ब.न. 2359 हे करीत आहेत तरी सदर मायता बाबत काही माहिती मिळाल्यास जेजुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा.