क्राईम

Crime News: भागीदाराकडून फ्लॅटचे कर्ज वापरण्यास घेवून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता, त्याचाच खून करून केली उपकाराची परतफेड, खून करणारे चार आरोपी चोवीस तासांचे आत केले जेरबंद

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): हवेली पोलीस स्टेशन गु.र.नं. २६५/२०२४ भा.न्या.सं. १०३(१), ६१(२), ३५२(२), ३(५) आर्म अॅक्ट ४,२७ प्रमाणे दि. २७/११/२०२४ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी नामे अनिता सतिश थोपटे, (वय ३१ वर्षे) रा. सुशीला पार्क कोल्हेवाडी, खडकवासला, ता. हवेली जि पुणे यांचे पती सतिश सुदाम थोपटे यांचा भाऊसाहेब सदाशिव किवळे रा. धायरीफाटा, हवेली पुणे यांचेसोबत जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. सतिश थोपटे यांनी फ्लॅटवर कर्ज काढून कर्जाची रक्कम रू. १८,५०,०००/- हे भाऊसाहेब किवळे यांना दिले होते. सदरचे कर्ज भाऊसाहेब किवळे हे भरणार असे त्यांचेत ठरले होते, परंतु कर्जाची रक्कम न भरल्याने सतिश थोपटे यांनी पैसे मागण्यास सुरूवात केली. पैसे मिळत नसल्याने सतिश थोपटे यांनी “भाऊसाहेब किवळे याने कर्ज भरले नसुन त्याची कर्ज भरणेची लायकी नाही” वगैरे मजकूराचे व्हॉट्स अॅप स्टेटस ठेवले होते, त्याचा राग मनात धरून भाऊसाहेब किवळे याने त्याचे चार साथीदारांना पाठवून सतिश सुदाम थोपटे (वय ३७ वर्षे), याचा सुशीला पार्क कोल्हेवाडी येथे कोयत्याने वार करून खुन केला आहे. वगैरे बाबत वरील प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आला आहे.

सदरचा गुन्हा हा लोकवस्तीत भरदिवसा घडला असल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेवून सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सुचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तयार करून गुन्हयाचा समांतर तपास सुरु करणेत आला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणेत आले. चार अनोळखी व्यक्तींकडून कोयत्याने मारहाण करणेत आलेली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपींची ओळख पटविणेकरीता गोपनीय बातमीदारांकडे संपर्क केला असता, आरोपीपैकी एक आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे नाव देवा लक्ष्मण तांबट रा. कांजळे, भोर असे असल्याचे सांगितले. त्याअनुषंगाने त्याचा शोध घेत असताना चारही आरोपी हे खेड शिवापूर परिसरात असून ते कोल्हापूरकडे पळुन जाणेचे तयारीत आहेत, अशी बातमी स्था.गु.शा.चे पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने ताबडतोब कारवाई करत आरोपी नामे १) जिवन ऊर्फ बाळा शैलेश जगताप (वय २७ वर्षे), रा. दत्तवाडी, भंडारी हॉटेलच्या मागे, चोर गल्ली पुणे, २) अक्षय ऊर्फ वाबु बालाजी शेलार (वय २४ वर्षे), रा. शिवरे, ता. भोर, जि. पुणे, ३) सोहेल ऊर्फ फुक्या साजिदअली जोरा, (वय १९ वर्षे) रा. शिवरे बस स्टैंड शेजारी ता. भोर, जि. पुणे, ४) देविदास ऊर्फ देवा लक्ष्मण तांबट, (वय २० वर्षे), रा. कांजळे, तांबट आळी, ता. भोर, जि. पुणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपींकडे प्राथमिक चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींना पुढील तपास कामी हवेली पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले असून हवेली पो स्टे व स्था.गु.शा.चे पथक पुढील तपास करत आहेत.

यातील आरोपी देविदास ऊर्फ देवा लक्ष्मण तांबट याचेवर यापुर्वी खुनाचे प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. आरोपी भाऊसाहेब किवळे याचा शोध चालू आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी, हवेली विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पो स्टे चे पोनि सचिन वांगडे, स्था.गु.शाचे सपोनि कुलदीप संकपाळ, दत्ताजीराव मोहिते, पोसई अभिजीत सावंत, अंमलदार हनुमंत पासलकर, रामदास बाबर, राजू मोमीण, मंगेश थिगळे, अमोल शेडगे, मंगेश भगत, वैभव सावंत, काशिनाथ राजापुरे, हवेली पो स्टे चे सपोनि सागर पवार, पोसई संजय सुतनासे, अंमलदार विलास प्रधान, राजु मुंढे, संतोष तोडकर, महेद्र चौधरी यांनी केली असून पुढील तपास हवेली पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करणेत येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button