क्राईम

Crime News: जेजुरी येथे आढळला अनोळखी मृतदेह

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : दि. 09/09/2024 रोजी रात्री 08:30 वाजण्याचे सुमारास आनंद नगर समाज मंदिराजवळ भिंतीच्या कडेला एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 50 ते 55 वर्ष याचा मृतदेह मिळून आला आहे.

सदर मयताचे पोस्टमार्टम जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले असून त्याचा मृतदेह सध्या जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे शीतगृहात ठेवण्यात आला आहे. सदर मायताचे डोकिस काळे पांढरे केस, दाढी वाढलेली अंगात फिक्कट गुलाबी रंगाचा फुल बायाचा शर्ट व क्रीम कलरची पॅन्ट असून सदर बाबत जेजुरी पोलीस येथे माळसाकांत भीमराव भालेराव (वय 32 वर्ष) राहणार आनंद नगर जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी जेजुरी पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून त्यावरून जेजुरी पोलीस स्टेशन अकस्मात मयत रजिस्टर नंबर 94/24 बी.एन.एस.एस.194 प्रमाणे मयत दाखल करण्यात आले आहे.

सदर मताचा तपास स.पो.नि. दीपक वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नांदे ब.न. 2359 हे करीत आहेत तरी सदर माहिती बाबत काही एक माहिती मिळाल्यास जेजुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button