क्राईम

Crime News: दुभती जनावरे चोरी करणारी सराईत टोळी अटक करून पाच गुन्हे उघडकीस; 6,10,000/- किं चा मुद्देमाल हस्तगत: स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): ओतुर पोलीस स्टेशन पो.स्टे गु.र.नं. ३५८/२०२५ बी.एन.एस.३०३ (२) प्रमाणे दि.१२/१२/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील फिर्यादी नामे मधुकर रामजी गायकर (वय ६५ वर्षे) व्यवसाय शेती रा. आंबेगव्हाण ता. जुन्नर जि. पुणे यांच्या गोठ्यातील दोन म्हशी पैकी एक म्हैस दि. १२/१२/२०२५ रोजी पहाटेच्या वेळी चोरी गेली होती. त्या अनुषंगाने फिर्यादीने वरील प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.

जुन्नर उपविभाग परिसरात मागील काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांची जनावरे चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने ओतूर, जुन्नर, आळेफाटा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. शेतकरी शेती या मुख्य व्यवसायासोबत पुरक व्यवसाय म्हणून पशुपालन करतात त्या द्वारे दुग्धव्यवसाय करून कुटुंबाचे उपजिवीके करीता आधार निर्माण होतो. शेतकऱ्यांची दुभती जनावरे चोरी गेल्याने कुटुंबातील लहान मुलांकरीता आवश्यक दुधाची कमतरता भासून शेतकऱ्यावर बाहेरून दुध खरेदी करण्याची वेळ आली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व संताप निर्माण झाला होता.

सदर गुन्हयांचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी गुन्हयांची शृंखला व गंभीरता लक्षात घेवून गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेवून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकरीता एक विशेष तपास पथक स्थापन केले. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वरील गुन्हयांचा तपास समांतर रित्या सुरू केला. सर्व घटनास्थळाची पाहणी करून फिर्यादी व साक्षीदार यांचेकडे चौकशी केली. सर्व गुन्हयांमध्ये दुभती जनावरे ही रात्रीचे वेळी चोरी करणेत आली होती. त्याचप्रमाणे चारचाकी पिकअप वाहनाचा वापर करणेत आल्याचे तपासात निष्पन्न झाले. सुमारे १२० किमी पर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासणेत आले. प्रत्येक गुन्हयातील चोरी करणारे वाहन हे माळशेज घाटाकडे जात असल्याचे समोर आले.

तपास पथकाकडून गुन्हयांचा तपास सुरू असताना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार नरेशी भाऊ मोरे रा. कळबड ता. मुरबाड जि ठाणे याने त्याचे साथीदाराचे मदतीने वरील गुन्हे केले असून त्याचे जवळ पिकअप चारचाकी वाहन आहे. त्या बातमीचे आधारे संशयित आरोपीबाबत माहिती काढून खात्री करत असताना, दि. २४/१२/२०२५ रोजी तपास पथक हे ओतूर परिसरात गुन्हे तपास करत असताना आरोपी नरेश भाऊ मोरे व त्याचा साथीदार असे पिकअप वाहनात म्हैस घेवून विक्री साठी जात असून ते सध्या खुबी गावचे जंगलाजवळ आहेत, अशी बातमी मिळाल्याने तपास पथकाने आरोपी १) नरेश भाऊ मोरे (वय ३९ वर्षे), व्यवसाय शेती, रा. कळबड ता. मुरबाड, जि. ठाणे २) सुरज अशोक पारधी (वय १९ वर्षे) रा. कळंबड, ता. मुरबाड, जि.ठाणे यांना त्यांचे ताब्यातील पिकअप चारचाकी वाहन नं. एम.एच. ०५ डी. के. २७६१ सह ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांचेकडील चौकशीत एकूण ०५ म्हशी हस्तगत करणेत आल्या असून गुन्हयात वापरलेल्या वाहनासह एकूण ६,१०,०००/- किं.चा. मुद्देमाल हस्तगत करणेत आहे.

गुन्हयातील आरोपी नरेश भाऊ मोरे याचेवर जनावर चोरीचे एकूण ०९ गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी रिमांड मंजूर करणेत आली आहे.

दुभती जनावरे शेतकऱ्यांना पुन्हा ताब्यात मिळाल्याने शेतकऱ्यांना व कुटुंबातील सदस्यांना आनंद झाल्याने त्यांनी पोलीसांचे कर्तव्यपुर्ती प्रति समाधान व्यक्त करून सर्वांचे आभार मानले आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, जुन्नर विभाग जुन्नर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स.पो.नि. महादेव शेलार, ओतूर पो स्टे चे स.पो.नि. लहू थाटे, स्था.गु.शा.चे पोलीस अंमलदार दिपक साबळे, संदीप वारे, राजु मोमीण, अक्षय नवले तसेच ओतुर पोलीस स्टेशनचे पो.हवा. नदीम तडवी, दिनेश साबळे, रोहित बॉबले यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button