News: जेजुरी नगराध्यक्षासाठी 5 अर्ज ; नगरसेवक पदासाठी 86 उमेदवारी अर्ज

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवार अखेर नगराध्यक्षपदासाठी ५ तर नगरसेवकपदासाठी ८६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी शीतल मुळे यांनी ही माहिती दिली.
जेजुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जयदीप दिलीप बारभाई, भाजपकडून सचिन रमेश सोनवणे, रवींद्र साधू जोशी, हरिदास रत्नपारखी तर शिवसेना शिंदे गटाकडून दिनेश दिलीप सोनवणे यांनी अर्ज दाखल केले.

नगरपरिषदेच्या १० प्रभागातून २० नगरसेवक निवडूण द्यायचे आहेत. यासाठी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा आणि अपक्ष अशा एकूण ८६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सोमवार हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांनी जेजुरी नगरपरिषदेच्या कार्यालयात गर्दी केली होती.

