नोकरीमहाराष्ट्र

News: पुणे ग्रामीण पोलीस घटकाची पोलीस शिपाई पदाची भरती

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुणे ग्रामीण पोलीस घटकाची पोलीस शिपाई पदाची भरती दि. १९/०६/२०२४ पासून पोलीस अधीक्षक, मुख्यालय मैदान चव्हाणनगर, पुणे येथे घेण्यात येत आहे.

आज दि. १९/०६/२०२४ रोजी पोलीस शिपाई चालक पदासाठी मैदानी चाचणीसाठी ५०० उमेदवार बोलावण्यात आले होते. त्यापैकी २९२ उमेदवार हजर राहीलेले आहेत तर उर्वरित २०८ उमेदवार गैरहजर राहीलेले आहेत हजर २९२ उमेदवारापैकी २५७ उमेदवार शारीरीक चाचणीसाठी पात्र ठरलेले आहेत कागदपत्रे पडताळणीत १२ व शारीरीक मोजमापात २३ उमेदवार अपात्र ठरलेले आहेत. उमेदवारांची शारीरीक चाचणीसाठी RFID तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.

सदर पोलीस भरतीकरीता येणाऱ्या उमेदवारांपैकी बाहेर गावाहून येणाऱ्या उमेदवारांकरीता तात्पुरत्या निवाऱ्याची (रात्रीसाठी) तसेच स्वच्छतागृहाची सोय पोलीस मुख्यालय आवारातील बाणेर रोडवरील पुरंदर हॉल समोरील पेंडॉल येथे दि १८/०६/२०२४ पासून भरती प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत करण्यात आलेली आहे. पुणे ग्रामीण पोलीस भरती सन २०२२-२३ करीता बाहेर गावाहून येणाऱ्या उमेदवारांनी तात्पुरत्या निवाऱ्यासाठी (रात्रीसाठी) तसेच स्वच्छतागृहासाठी पोलीस मुख्यालय आवारातील बाणेर रोडवरील पुरंदर हॉल समोरील पेंडॉलचा वापर करावा असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस दला मार्फत करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button