नोकरीमहाराष्ट्र

JobNews: 136 इन्फंट्री बटालियन (टीए) (इको) महारच्या भरती मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): मराठवाडा पर्यावरण बटालियन अंतर्गत येत असलेल्या १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) (इको) महारमध्ये सशस्त्र दलातील माजी सैनिक, माजी महिला कर्मचारी, राज्य वन विभागाचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ५३ पदे भरावयाची असून संबंधितांनी भरती रॅलीत भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संभाजीनगर मिलिटरी कँट (सर्वत्र स्टेडियम) येथे २३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात येणार आहे. १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इको महार या बटालियन मध्ये सोल्जर जीडी (सामान्य कर्तव्य) ही ४२ पदे (महाराष्ट्र राज्य निवासी), लिपिक जीडी (सामान्य कर्तव्य) ६, हॉऊस किपर, लोहार, मेस किपर, कारागीर (लाकूड – कामगार), स्टेवार्ड (कारभारी) ही प्रत्येकी एक (संपूर्ण भारतातील निवासी) अशी एकूण ५३ पदे रॅलीच्या माध्यमातून भरावयाची आहेत. या बटालियनमध्ये भरती झालेल्या उमेदवारांना वृक्षारोपण उपक्रमात मराठवाडा विभागात तसेच पूर्ण देशात कर्तव्य बजावावे लागेल.

पात्रता/सेवेची अट पुढीलप्रमाणे: माजी सैनिक, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग व राज्य वन विभागाच्या माजी महिला कर्मचारी (अकाली सेवानिवृत्तांसह) यांना किमान वयाची अट नाही. मात्र, रॅलीमध्ये भाग घेताना सेवानिवृत्तीपासून ५ वर्षांच्या आत असावे. किमान सेवा २० वर्षे असावी. माजी सैनिक (इतर पदे) वयाच्या ५० वर्षापर्यंत भरतीस पात्र ठरतील. माजी सैनिक निवृत्तीवेतन धारक असावेत. उमेदवारांची वैद्यकीय श्रेणी १ मधील असावी. सेवानिवृत्तीच्या वेळी माजी सैनिकांचे चारित्र्य प्रशंसनीय आणि खूप चांगले असावे. पोलीस प्रकरणामध्ये कोणताही गुन्हा दाखल झालेला नसावा.

भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि उपदान मिळणार नाही. निवडलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागेल. उमेदवाराची शाररिक चाचणी नियमानुसार घेण्यात येईल. भरती मेळाव्यादरम्यान उमेदवारांना झालेल्या कोणत्याही अपघातास, दुखापतीस भरती करणारे प्राधिकारी जबाबदार राहणार नाही. उमेदवारांची निवड ही पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. माजी सैनिकांचे पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ), डिस्चार्ज बुक, अलीकडील पासपोर्ट आकाराचे आठ रंगीत छायाचित्र, शिक्षण प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र व आधार कार्डची इत्यादी कागदपत्र उमेदवारांनी सोबत आणणे आवश्यक राहील.

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९१६८१६८१३६ वर संपर्क साधून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) (इको) महारचे लेफ्टनंट कर्नल एम.एस. नेगी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button