Crime News: जेजुरी येथे आढळला अनोळखी पुरुष मृतदेह

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर भाजीपाला विकी करणारे पत्रा शेड मध्ये एक अनोळखी पुरूष मृतदेह आढळला असून याबाबत अविनाश बाळासो मदने (वय ४० वर्षे) व्यवसाय मजुरी रा. विद्यानगर, जेजुरी ता. पुरंदर जि.पुणे यांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली आहे.
याबाबत जेजरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरी बाजार तळ दि. १५/१२/२०२५ रोजी सकाळी ९/०० वा चे सुमारास मी कामानिमित्त जेजुरी जिल्हा परीषद प्राथमिक शाळेसमोर भाजीपाला विकी करणारे पत्रा शेड मध्ये एक अनोळखी पुरूष इसम बसलेला होता. त्याची कोणतीच हालचाल होत नसल्याने मी त्यास आवाज देवुन हाताने हालवुन पाहीले असता त्याचा – कोणताच प्रतिसाद येत नसल्याने तो अनोळखी पुरूष वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयाचा इसम नांव व पत्ता माहीत नाही मयत झाल्याचे समजल्याने मी जेजुरी पोलीस स्टेशन येथे माहीती दिली नंतर अॅम्ब्युलन्स मधुन अनोळखी पुरूष इसमास जेजुरी ग्रामीण रूग्णालय येथे घेवुन गेलो. तेथील डॉक्टरांनी त्यास तपासुन तो मयत झाल्याचे घोषित केले आहे.
सदर अनोळखी व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास जेजुरी पोलीस स्टेशनची संपर्क साधावा.



