आपला जिल्हा

News: जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दरवर्षी २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात असून या दिनानिमित्त २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्ताने २७ डिसेंबर रोजी जिल्हा व तालुका स्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील योजना व तक्रार निवारणाबाबत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात नागरिकांमध्ये वस्तू व सेवा खरेदी करताना दर्जा तसेच वजनमापांमध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून सावधानता बाळगण्याबाबत संदेश प्रदर्शित करण्यात येणार आहे.

ग्राहक हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ग्राहकांच्या जबाबदाऱ्या कर्तव्ये आदींबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी संदेश व माहिती देणारे विविध शासकीय कार्यालयांची दालने प्रदर्शनात असणार आहेत. या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सिमा होळकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button